पाय घसरून पडल्याने युवतीचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:43 IST2018-03-05T00:43:16+5:302018-03-05T00:43:16+5:30
सटाणा : मांडवाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या पिंपळगाव (दाभाडी) येथील चौदा वर्षीय युवतीचा पाय घसरून डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.

पाय घसरून पडल्याने युवतीचा जागीच मृत्यू
सटाणा : मांडवाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या पिंपळगाव (दाभाडी) येथील चौदा वर्षीय युवतीचा पाय घसरून डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना मालेगाव तालुक्यातील वजीरखेडे येथे शनिवारी सायंकाळी घडली. मालेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील बलराम बाळकृष्ण पवार यांची नववीत शिकणारी मुलगी नेहा (१४) ही आपल्या कुटुंबीयांसह वजीरखेडा येथे नातेवाइकांकडे मांडवाच्या कार्यक्रमासाठी गेली होती. नेहा पंगतीतून जेवण करून उठल्यानंतर पाणी पिण्यासाठी गेली. पाणी पिल्यानंतर ओल्या फरशीवर पाय घसरल्याने तिचा तोल जाऊन ती पडली. तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मेंदूमध्ये अतिरक्तस्त्राव झाला
नेहाला उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत झाल्याचे सांगितले. मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून तिचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला. या घटनेने पिंपळगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.