दुष्काळी परिस्थितीमुळे आठवडे बाजारात उलाढाल मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:14 IST2018-12-10T23:13:06+5:302018-12-10T23:14:33+5:30
पाटोदा : येवला तालुक्यात यावर्षी भयाण दुष्काळ पडला असून, त्याचे ढग दिवसेंदिवस गडद होत आहेत. दुष्काळाचा परिणाम पाटोदा येथील सोमवारच्या आठवडे बाजारावरही दिसून आला. सोमवारी येथील आठवडे बाजार असूनही बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून आली नाही. त्यामुळे उलाढाल मंदावल्याचे चित्र पहावयास मिळाले. खरेदीसाठी ग्राहक कमी असल्याने अत्यल्प दरात शेतकरीवर्गाला भाजीपाला विकावा लागला.

दुष्काळी परिस्थितीमुळे आठवडे बाजारात उलाढाल मंदावली
पाटोदा : येवला तालुक्यात यावर्षी भयाण दुष्काळ पडला असून, त्याचे ढग दिवसेंदिवस गडद होत आहेत. दुष्काळाचा परिणाम पाटोदा येथील सोमवारच्या आठवडे बाजारावरही दिसून आला. सोमवारी येथील आठवडे बाजार असूनही बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून आली नाही. त्यामुळे उलाढाल मंदावल्याचे चित्र पहावयास मिळाले. खरेदीसाठी ग्राहक कमी असल्याने अत्यल्प दरात शेतकरीवर्गाला भाजीपाला विकावा लागला.
गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी परिसरात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया गेल्यात जमा आहे. येथील आठवडे बाजारामध्ये भाजीपाल्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून आले. परिसरातील ठाणगाव, पिंपरी, कानडी, शिरसगाव, लौकी दहेगाव, वळदगाव येथील शेतकरी तसेच शेतमजूर, बाजारासाठी येत असतात; परंतु गेल्या काही दिवसांपासून शेतात कामे नसल्याने शेतमजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने मजूर आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
आठवडे बाजारात बटाटे १२ ते १५ रु पये किलो, कोबी ५ रु पये किलो, फ्लॉवर १० रु पये किलो, वांगे २० रु पये किलो, या भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याचे दिसून आले तर दोडका, गिलके, वाल, गवार प्रत्येकी ४० रु पये किलोप्रमाणे विक्र ी होत होती.