शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बंदमुळे कांद्याचे भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:09 IST

नाशिक : गेल्या चार ते पाच दिवसांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव सोमवारी (दि.१८) पूर्ववत सुरू झाले; मात्र चार दिवसांच्या बंदमुळे कांद्याच्या दरात ३०० ते ३५० रुपयांची घसरण झाली. बागलाण व लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक न झाल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट असल्याचे सूत्रांचे म्हणणे होते.

नाशिक : गेल्या चार ते पाच दिवसांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव सोमवारी (दि.१८) पूर्ववत सुरू झाले; मात्र चार दिवसांच्या बंदमुळे कांद्याच्या दरात ३०० ते ३५० रुपयांची घसरण झाली. बागलाण व लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक न झाल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट असल्याचे सूत्रांचे म्हणणे होते.दरम्यान, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांना सोमवारपासून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील लिलाव पूर्ववत सुरू न झाल्यास व्यापाºयांंचे परवाने रद्द करण्याची तंबी दिली होती. जिल्हाधिकाºयांच्या या इशाºयानंतर जिल्ह्णातील १४ पैकी १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्यासह अन्य फळभाज्यांचे लिलाव पूर्व पदावर आले. मागील आठवड्यात बुधवारी (दि.१३) दुपारी १५०० रुपयापर्यंत असलेले कांद्याचे क्ंिवटलचे दर सोमवारी बाजार बंद होण्याच्या वेळी ११५० पर्यंत खाली घसरले. आयकर विभागाच्या छाप्यामुळे बाजार समित्यांमधील कांदा व्यापाºयांनी पुकारलेल्या अघोषित संपामुळे गेल्या तीन-चार दिवसांत कोट्यवधींचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. दिवसाला सरासरी दीडशे ते दोनशे क्ंिवटल कांद्याची आवक नाशिकच्या १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये होते. मागील आठवड्यात कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे भाव एका महिन्यात १३०० रुपयांनी घसरल्याचे चित्र होते. केंद्र सरकारने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कांद्याचे भाव व अहवाल मागविला आहे. मागील महिन्यात २८०० रुपयांपर्यंत क्विंटलला गेलेला भाव एका महिन्याभरातच आवक वाढल्याने चक्क १५०० रुपयांपर्यंत गडगडला होता. तो आता बाजार सुरू होताच ११५० पर्यंत खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकºयांची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आयकर विभागाच्या धाडसत्रामुळे व्यापाºयांनी बाजार समित्यांना पत्र देऊन काही दिवसांसाठी लिलावात सहभागी होता येणार नाही, असे कारण दिले होते. सरकारच्या नवीन धोरणामुळे कांदा साठवणुकीवर मर्यादा आली आहे. या मर्यादेमुळेच कांदा व्यापारी कांदा साठवणुकीस तयार नसून, त्यामुळे कांदा खरेदीही करण्यास नाखूश असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांचे म्हणणे होते. आता बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाल्याने कांदा विक्रीसाठी जादा प्रमाणात येण्याची चिन्हे आहेत.लासलगाव येथे आजपासून लिलावच्लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवार (दि.१९)पासुन व्यापारी लिलावात सहभागी होणार आहेत. सोमवार पासून बाजार समित्यामध्ये कांदा लिलाव सुरु करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आणि व्यापारी वर्गात झाला होता .मात्र लासलगांव येथे कांदा खळ्यात पाणी असल्याने माल टाकण्यास जागा नसल्यामुळे लासलगांव बाजार समितितील कांदा लिलाव बंद होते. मंगळवार पासून लिलाव पुन्हा सुरू होणार असल्याचे समजते. शुक्र वार पासून बाजार समितीत कोणतेही व्यवहार झाले नसल्याने बाजार समितीत शुकशुकाट होता. शनिवारी व रविवारी झालेल्या पावसामुळे कांद्याच्या खळयामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने कांद्याचे नुकसान झाले. या मुळे सोमवारी बाजार समितीत लिलाव होवु शकले नाही.