लहान मुलांच्या भांडणातून देवळाली कॅम्पमध्ये दोघांवर चाकूने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 17:29 IST2018-01-12T17:27:51+5:302018-01-12T17:29:58+5:30
नाशिक : लहान मुलांना चाकूचा धाक दाखविणा-यास समजावून सांगण्यासाठी गेलेल्या इसमावरच चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवळाली कॅम्पमध्ये घडली आहे़ या प्रकरणी संशयित सय्यद अब्दूल रौफ व त्याच्या दोन साथीदारांवर जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तर सय्यद रौफ यांनीही चौघांविरोधात जीवे ठार मारण्याची फिर्याद दिली असून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

लहान मुलांच्या भांडणातून देवळाली कॅम्पमध्ये दोघांवर चाकूने वार
नाशिक : लहान मुलांना चाकूचा धाक दाखविणा-यास समजावून सांगण्यासाठी गेलेल्या इसमावरच चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवळाली कॅम्पमध्ये घडली आहे़ या प्रकरणी संशयित सय्यद अब्दूल रौफ व त्याच्या दोन साथीदारांवर जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तर सय्यद रौफ यांनीही चौघांविरोधात जीवे ठार मारण्याची फिर्याद दिली असून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
देवळाली कॅम्पमधील डेव्हलपमेंट एरियातील रहिवासी सागर किशोर परदेशी (४४) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी (दि़१०) सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास लहान मुलांना चाकूचा धाक दाखविणारा नूर व्हिला गेटवरील संशयित सय्यद अब्दूल रौफ (३२, राग़रीब नवाज कॉम्प्लेक्स, देवळाली कॅम्प) यास समजावण्यासाठी गेले होते़ या गोष्टीचा रौफ यास राग आल्याने त्याने आपल्या हातातील चाकूने परदेशी यांच्या डोक्यावर , कानाजवळ, डाव्या हातावर, दंडावर व पोटावर वार केले तर सोबत असलेल्या दोघा संशायितांनी लाथा मारून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे परदेशी यांनी फिर्यादीत म्हटले आहे़
तर सय्यद रौफ यांनीही पोलिसांत फिर्याद दिली असून त्यानूसार नूर व्हीला गेटवर दोन गटातील मुलांमध्ये भांडण सुरू होते़ भाडण सोडविण्यासाठी रौफ गेले असता संशयित सागर परदेशी याने त्यांच्या हातावर सुºयाने वार केले असता तो हाताने अडविल्याने हातास जखम झाली़ संशयित सिद्धू परदेशी व प्रशांत परदेशी यांनी पाठिवर लाकडी दांडक्याने मारहाण केली तर अनू परदेशी याने हातातील धारदार हत्याराने डोक्यावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़
या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सय्यद रौफ व सागर परदेशी यांच्या फिर्यादीनुसार एकमेकांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़