दसाणेत बेमोसमी पावसाने पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 18:45 IST2018-11-22T18:44:39+5:302018-11-22T18:45:15+5:30
मालेगाव तालुक्यातील दसाणेसह परिसरात दोन दिवसापूर्वी विजांच्या कडकडाटासह झालेल्या बेमोसमी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मालेगाव तालुक्यातील दसाणे परिसरात बेमोसमी पाऊस व वादळाने उद्ध्वस्त झालेली डाळिंब बाग.
दसाणे : मालेगाव तालुक्यातील दसाणेसह परिसरात दोन दिवसापूर्वी विजांच्या कडकडाटासह झालेल्या बेमोसमी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात अनेक काही शेतकऱ्यांच्या डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्या. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकºयांची एकच धावपळ उडाली. शेतकºयांनी साठवून ठेवलेला कांदा पावसात भिजुन त्याचेही नुकसान झाले.
दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या माळमाथ्यावरील शेतकºयांच्या तोंडाचा घास पावसाने हिरावून नेला. माळमाथा भागात तीव्र पाणी टंचाई असल्याने शेतकºयांनी टॅँकरने विकतचे पाणी घेऊन डाळिंब बागा जगविल्या होत्या.
वादळात डाळिंबाचे झाडे जमिनीवर उन्मळून पडली. संबंधित शासकीय यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकºयांना भरपाई द्यावी अशी मागणी रघुनाथ पवार, बबन पवार, चिंधा पवार, वसंत पवार, हितेश पवार, शिवाजी देसले, शाम पवार, दत्तु पवार यांनी केली आहे.