शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा मतमोजणीमुळे रविवारी वाहतूक मार्गात बदल

By admin | Updated: October 18, 2014 00:54 IST

विधानसभा मतमोजणीमुळे रविवारी वाहतूक मार्गात बदल

नाशिक : शहरातील चार मतदारसंघांबरोबरच इगतपुरी मतदारसंघाची मतमोजणीही वेगवेगळ्या ठिकाणी होणार असल्याने त्या-त्या ठिकाणी गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो़ त्यामुळे पोलीस उपआयुक्त निसार तांबोळी यांनी काही मार्गावरील वाहतूक मार्गात बदल केले आहेत़ रविवारी (दि़ १९) सकाळी ६ ते दुपारी ३ या कालावधीपर्यंत या मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहेत़नाशिक पूर्व व पश्चिम या दोन मतदासंघाची मतमोजणी अंबड वेअर हाऊस येथे होणार आहे़ त्यामुळे तेथील मार्गावर पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत़ ग्लॅक्सो कंपनी मेनगेट - ग्राफाईट कंपनी- सिबल- संजीवनी बॉटनिक नर्सरीपर्यंतच्या मार्गावर दोन्ही बाजूने ये-जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात येणार आहे़ या मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांना संजीवनीनगर - एक्स्लो कंपनी- गरवारे टी पॉर्इंटपासून इतरत्र जाता येईल़जी़ पी़ इलेक्ट्रॉनिक्स - महेश कंपनी - संजीवनी बॉटनिक नर्सरी - सेंट्रल वेअर हाऊस कार्पोरेशन ते एम़एस़ई़बी. पॉवर हाऊसचे वॉलकंपाऊंच्या सुरुवातीच्या टोकापर्यंत अंबड वेअर हाऊस समोरील मुख्य रस्ता दोन्हीही बाजूने ये-जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे़ या मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांना एम़एस़ई़बी. पॉवर हाऊस - अंबड गाव - सिडको हॉस्पिटलपासून इतरत्र जाता येईल़ओमसाई किचन कंपनी - कॉपरट्रॅक - अदिती इंडस्ट्रिज - फॉक्स कंपनी - प्रिंटेक्स इंजिनिअर्स - एलजय कंपनीपर्यंतचा रस्ता दोन्हीही बाजूने ये-जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी प्रवेश बंद असणार आहे़देवळाली मतदारसंघाची मतमोजणी चिंचबन कॉर्नरजवळील महानगरपालिकेचे नवीन पंचवटी विभागीय कार्यालय इमारत येथे होणार आहे़ त्यामुळे मखमलाबाद नाका ते चिंचबन कॉर्नरपर्यंत दोन्ही बाजूने मार्ग वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून, नागरिकांनी वाहतुकीसाठी खालील मार्गाचा वापर करावा़ मालेगाव स्टॅण्डकडून मखमलाबाद नाक्याकडे येणारी वाहतूक ही रामवाडीकडे न जाता सरळ जातील तसेच पेठफाटामार्गे इतरत्र जातील़पेठफाट्याकडून येणारी वाहने ही रामवाडीकडे न जाता मालेगाव स्टॅण्डमार्गे इतरत्र जातील़ मखमलाबाद गावाकडून येणारी वाहने क्रांतीनगरकडे न जाता उजवीकडे वळून चोपडा लॉन्स तसेच डावीकडे वळून पेठरोडमार्गे इतरत्र जातील़ (प्रतिनिधी)