राजापूरला शेतवस्तीवर लावलेल्या पिंजऱ्यात  बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:45 IST2019-02-27T00:45:22+5:302019-02-27T00:45:54+5:30

तालुक्यातील राजापूर येथे शेतवस्तीवर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दहशतीच्या वातावरणात वावरणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

 Dry leopard in a cage planted in Rajapur | राजापूरला शेतवस्तीवर लावलेल्या पिंजऱ्यात  बिबट्या जेरबंद

राजापूरला शेतवस्तीवर लावलेल्या पिंजऱ्यात  बिबट्या जेरबंद

दिंडोरी : तालुक्यातील राजापूर येथे शेतवस्तीवर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दहशतीच्या वातावरणात वावरणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
तालुक्यात पाळीव प्राण्यांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार दिंडोरी वनविभागाने तालुक्यात तेरा पिंजरे लावले होते. त्यापैकी राजापूर येथील राजेंद्र देशमुख, आनंदा गावंडे यांच्या शेतात पिंजरा लावला होता. मंगळवारी (दि. २६) सकाळी ८ वाजता लक्ष्मण खराटे व सागर देशमुख शेतात कामानिमित्त गेले असता पिंजºयामध्ये बिबट्या अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ दिंडोरी वनविभागाशी संपर्क साधला. वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश गांगुर्डे यांनी बिबट्याला ताब्यात घेतले.

Web Title:  Dry leopard in a cage planted in Rajapur