शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ एक, बैठका दोनपदाधिकारी-प्रशासनाचा असाही आढावा

By admin | Updated: October 21, 2015 23:21 IST

दुष्काळ एक, बैठका दोनपदाधिकारी-प्रशासनाचा असाही आढावा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या कारभारात सत्ताधाऱ्यांमध्ये असलेला अंतर्गत संघर्ष थेट राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचलेला असतानाच आता पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यातही समन्वयाचा ‘अभाव’ असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.काल (दि.२१) जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि दुष्काळासह विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी प्रशासन आणि पदाधिकारी यांच्या दोन वेगवेगळ्या बैठकांचे आयोजन करण्यात आल्याचे चित्र होते. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी त्यांच्या कक्षात जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेत त्यांना विकासकामे मार्गी लावण्याबरोबरच दिलेले उद्दिष्ट साध्य करण्याच्या सूचना केल्या. तर दुसरीकडे नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनीही गटविकास अधिकारी, लघुपाटबंधारे व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेत दुष्काळ व टंचाईच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सूचना केल्या. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी त्यांच्या कक्षात घेतलेल्या बैठकीत गटविकास अधिकाऱ्यांकडून इंदिरा व रमाई घरकुल आवास योजना, जन्म-मृत्यूचे ग्रामपंचायत स्तरावर देण्यात येणारे दाखले. तेरावा वित्त आयोगाचा तपशीलवार खर्च याबाबत आढावा घेतला. निमगाव वाकडा, पाटोदा व जोगमोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याबाबत प्रशासनाला विचारणा केली. तसेच दुष्काळी परिस्थितीच्या अनुषगांने टंचाई आराखड्याचे नियोजन करण्याबाबत सादरीकरण करण्यास सांगितले असता फक्त चांदवड पंचायत समितीचे सादरीकरण करण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. याचवेळी त्यांनी कुपोषण व शालेय शिक्षणाबाबत आढावा घेतला. बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशीआदि उपस्थित होते. दुसरीकडे विस्तारित प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी जिल्ह्यातील दुष्काळ व टंचाईबाबत तब्बल सात ते आठ तास आढावा घेतला. (प्रतिनिधी)