शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

आठ तालुक्यात दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 02:11 IST

नाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून पावसाकडे आशा लावून बसलेल्या नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांची दुबार पेरणीची संधीही संपुष्टात येण्याचे संकट घोंघावू लागले आहे. आॅगस्टच्या दुसरा आठवड्यातही वार्षिक सरासरीच्या ५० टक्केही पाऊस न पडल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती ओढवण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देनाशिक जिल्हा : दुबार पेरणीही अशक्य

नाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून पावसाकडे आशा लावून बसलेल्या नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांची दुबार पेरणीची संधीही संपुष्टात येण्याचे संकट घोंघावू लागले आहे. आॅगस्टच्या दुसरा आठवड्यातही वार्षिक सरासरीच्या ५० टक्केही पाऊस न पडल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती ओढवण्याची शक्यता आहे.सन २०१२मध्ये अशाच प्रकारे जुलै अखेर ९७ टक्के पेरण्या झाल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यावर कोसळलेल्या संकटाची पुनरावृत्ती होते की काय अशी भीतीही यानिमित्ताने व्यक्त होवू लागली आहे. यंदा जूनच्या शेवटच्या आठवड्यात उशिराने मान्सूनचे जिल्ह्णात आगमन झाल्यामुळे मे महिन्यापासून शेतीची मशागत करून ठेवलेल्या शेतकºयांचा पेरणीसाठी धीर सुटू लागला असताना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे पेरणीला वेग देण्यात आला.जून महिन्यातील पर्जन्यमानाचा विचार करता, फारसा समाधानकारक पाऊस झाला नसला तरी, जमिनीची धूप कमी होण्यास त्यामुळे मदत झाल्याने जुलै महिन्यात दमदार पावसाच्या भरवश्यावर जवळपास ८२ टक्के पेरणी पूर्ण करण्यात आली. उर्वरित पेरणी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाली. परंतु जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे महिनाभरापूर्वी पेरणी केलेल्या पिकाला आता खºया अर्थाने पावसाची गरज आहे. साधारणत: जिल्ह्णाच्या पूर्व भागातील मालेगाव, देवळा, नांदगाव, येवला, बागलाण, चांदवड या तालुक्यांतील मका, बाजरी पिकाचे दाणे भरण्याची अवस्था आणखी दहा ते बारा दिवसांत सुरू होणार असून, याच काळात कपाशींचे बोंड फुटणार आहे. पिकाचे उत्पन्न वाढीसाठी या काळात पिकांना पाणी हवे आहे, त्याचबरोबर पश्चिम पट्ट्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यात भाताची आवणी पूर्ण होवून त्यांनाही आता फुटवे फुटू लागले आहेत. सध्या तरी या भागात अधून-मधून पावसाची हजेरी कायम असल्याने त्यांना फारशी चिंता नसली तरी, एकदमच पावसाने दडी मारल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्णातील काही तालुक्यात पावसाअभावी उशिराने पेरणी करण्यात आल्याने या ठिकाणी पाऊस पडूनही उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.दुसरा हंगामही वाया जाण्याची भीतीसध्या रुसलेल्या पावसामुळे शेतकºयांच्या चालू हंगामावर त्याचा परिणाम होण्याबरोबरच आॅक्टोंबरअखेर लागवड केल्या जाणाºया कांदा पिकदेखील घेता येईल की नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्णातील शेतकरी साधारणत: दरवर्षी पावसाळ्यात दोन पिकांचे हंगाम घेत असतो. जून, जुलैमध्ये मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन यासारखे पिके घेतो व आॅक्टोबरनंतर कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु यंदा पहिल्या हंगामातील पीक पेरणीच धोक्यात आल्याने दुसरा हंगाम कोरडा जाण्याची शक्यताही जाणकार व्यक्त करीत आहेत.आठ तालुके तहानलेलेगेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जवळपास २० टक्के पाऊस कमी झाला असून, जिल्ह्णात आॅगस्टच्या दुसºया आठवड्यापर्यंत सरासरी ६० टक्के पर्जन्यमान नोंदविले गेले आहे. पश्चिम पट्ट्यातील तालुके वगळता दिंडोरी, मालेगाव, नांदगाव, चांदवड, कळवण, बागलाण, देवळा, निफाड या आठ तालुक्यांत अद्यापही ५० टक्के पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिकांची अवस्था तर बिकट झालीच आहे, परंतु पिण्यासाठीदेखील पाणी नसल्याने या तालुक्यांना आॅगस्ट महिन्यातही टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ