द्राक्षपंढरीला दुष्काळाचा डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 05:51 PM2018-12-06T17:51:20+5:302018-12-06T17:53:22+5:30

सायखेडा : यंदाच्या वर्षाला म्हणावा तसा पाऊस बरसलाच नसल्याने जिल्हा भरात दुष्काळचे सावट पसरलेले आहे. अशात आहे ती पिके वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत असतांना विविध उपाय योजना करत असतांना पाणी बचतीसाठी ऊसाचे पाचट संजीवनी ठरत आहे.

Drought | द्राक्षपंढरीला दुष्काळाचा डंख

द्राक्षपंढरीला दुष्काळाचा डंख

googlenewsNext
ठळक मुद्देपाणी टंचाईवर जिल्ह्यात निफाडच्या पाचटाला मागणी

सायखेडा : यंदाच्या वर्षाला म्हणावा तसा पाऊस बरसलाच नसल्याने जिल्हा भरात दुष्काळचे सावट पसरलेले आहे. अशात आहे ती पिके वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत असतांना विविध उपाय योजना करत असतांना पाणी बचतीसाठी ऊसाचे पाचट संजीवनी ठरत आहे.
सधनतेचा डंका वाजवणाऱ्या निफाड तालुक्याला दुष्काळी परीस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्याचे प्रमुख पिक असणाºया द्राक्ष बागांना याची झळ बसत असल्यामुळे जवळपास बावीस हजार हेक्टरहुन आधिक क्षेत्रात अता पाणी टंचाई वर प्रभावी उपाय म्हणुन ऊसाचे पाचट ठरले आहे. त्यामुळे निफाडच्या ऊसाच्या पाचटांच्या गाठीना जिल्हाभरातुन मागणी वाढली आहे.
निफाड तालुक्यात गोदावरी कादवा बाणगंगा सह नांदुरमध्यमेश्वर धरण, कालवे यामुळे बागायती क्षेत्र वाढले. परंतु वाढती लोकसंख्या आणि पाण्याच्या श्रोतांवर येणारा ताण यामुळे दरवर्षी दुष्काळ परीस्थिती निर्माण होवु लागली आहे.
या परीस्थीतीत तालुक्याच्या सर्वच भागात असणाºया द्राक्षशेतीला याची धग बसु लागली आहे. परीणामी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या बागांना वाचविण्यासाठी शेतकरी टॅँकरने पाणी विकत घेवुन पिक जगवण्याचा प्रयत्न करत आहे. द्राक्षबरोबरच तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठे असल्याने टंचाई काळात उस द्राक्षबागांसाठी वरदान ठरत आहे. सध्या तालुक्यातील ऊसाच हंगाम भरात आला आहे. या ऊसाच्या फडातील शिल्लक राहिलेले पाचटाच्या मशिनच्या साह्याने गाठी तयार करुन त्या द्राक्षबागांसाठी पुरवली जात आहे. हे पाचट द्राक्षबागांच्या गल्यात टाकल्यामुळे एकरात लाखो लीटर पाण्याची बचत होवु लागल्यामुळे नाशिक, दिंडोरी, चांदवड, वणी, येवला, सिन्नर, कोपरगाव, कसमा पट्टा तसेच द्राक्षपंढरीतील गावांत पाणी बचतीसाठी ऊसाचे पाचट वापरले जावु लागले आहेत. ऊसाचे रान खाली झाल्यावर पाचटांच्या गाठी तयार केल्या जात आहे. एक गाठ साधरण स्थानिक तीस तर बाहेर अंतरानुसार साठ रुपयांपर्यत मिळते. त्यागाठीत जवळपास द्राक्षबागेतील पाचते सहा झाडे होतात त्यामुळे जिल्हाभरातील शेतकरी आपल्या बागांत पाचट टाकण्याचा कल वाढला आहे.
फायदे
१) द्राक्षबागांना मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत.
२) द्राक्षांच्या मुळ्यांची वाढ होते.
३) जमीनीचा पोत राखला जातो.
४) जमिन भुसभुशीत होते.
५) शेतातत सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.
६) ऐकरात २५० ते तीनशे गाठी.
७) ऐक आयशरमध्ये २५० गाठी.
८) उस उत्पादक शेतकर्यांना चार रु पये गाठ.
९) स्थानिक द्राक्षबागायता दारांना तीस रु पये.
१०) बाहेरील शेतकºयांसाठी ५५ ते ६० रु पये गाठ.
चौकट
तालुक्यात यंदा अपेक्षीत पाऊस बरसला नाही आॅक्टोबर महिन्यापासुनच पाणी टंचाईचा फटका बसु लागल्यामुळे शेतकरी आता ऊसाच्या पाचटापासुन मल्चींग करत आपल्या बागांना पाणी देत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होवुन त्यावर मात होत आहे.
- शहाजी राजोळे,
द्राक्षउत्पादक शेतकरी.
 

Web Title: Drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.