मीरगाव फाट्यावर चालकास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:58 IST2018-10-08T00:58:26+5:302018-10-08T00:58:43+5:30

सिन्नर : शिर्डी रस्त्यावरील मीरगाव फाट्याजवळ असलेल्या गणपती मंदिरासमोर मध्य प्रदेशातील आयशरला मोटारसायकल आडवी लावून चालकाला बेदम मारहाण करीत लुटल्याची घटना रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.

The driver was robbed on the Megaon bog | मीरगाव फाट्यावर चालकास लुटले

मीरगाव फाट्यावर चालकास लुटले

ठळक मुद्देअज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल

सिन्नर : शिर्डी रस्त्यावरील मीरगाव फाट्याजवळ असलेल्या गणपती मंदिरासमोर मध्य प्रदेशातील आयशरला मोटारसायकल आडवी लावून चालकाला बेदम मारहाण करीत लुटल्याची घटना रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
इंदूरहून सिन्नरमार्गे पुणे येथे जाणारा आयशर टेम्पो (क्र. एमपी ०९ पीजी ९१२४) शिर्डीच्या दिशेने जात असताना सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मीरगाव फाट्यावर गणपती मंदिरासमोर अज्ञात पल्सर मोटारसायकल स्वाराने आयशर टेम्पो थांबविण्यास भाग पाडले. आयशरचालक राहुलकुमार दिलीपसिंग वर्मा, रा. शिव्होर (मध्य प्रदेश) यास दगडाने व लाकडाने मारहाण करून त्याच्या जवळील ८ हजार रु पये रोख, सॅमसंग कंपनीचा जे-२ मोबाइल, दोन एटीएम कार्ड व डिझेल भरण्याचे एच.पी. कंपनीचे एटीएम काढून घेऊन पोबारा केला. घटनेनंतर रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी वावी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अंदाजे पंचवीस वयोगटातील तीन अज्ञात चोरटे असल्याचे चालकाने सांगितले. जखमी चालक राहुलकुमार याच्या फिर्यादीवरु न वावी पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The driver was robbed on the Megaon bog