कारचालकास फायटरने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 18:21 IST2020-08-18T18:21:26+5:302020-08-18T18:21:48+5:30

वणी : कारने मानोरी येथे जाणाऱ्या कारचालकाशी वाद घालुन फायटरने मारहाण करत शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याच्या चालकाच्या फिर्यादीवरु न दहा संशयितांविरोधात दंगलीचा तसेच जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दिंडोरी पोलीसांनी दहा लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

The driver was beaten by a fighter | कारचालकास फायटरने मारहाण

कारचालकास फायटरने मारहाण

ठळक मुद्देदिंडोरी : दहा संशयितांवर दंगलीचा गुन्हा

लोकमत न्युज नेटवर्क
वणी : कारने मानोरी येथे जाणाऱ्या कारचालकाशी वाद घालुन फायटरने मारहाण करत शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याच्या चालकाच्या फिर्यादीवरु न दहा संशयितांविरोधात दंगलीचा तसेच जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दिंडोरी पोलीसांनी दहा लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नामदेव सुकदेव घुगे (५०, राहणार, मानोरी) हे (एम एच १५ इ पी ६३३१) कारने मानोरी येथे घरी जात असताना किशोर सुर्यवंशी स्कुलजवळील पाटाजवळच्या रस्त्यावर दुचाकीवरु न दोन युवक आले व कारसमोर दुचाकी लावत घुगे यांना खाली उतरण्यास सांगितले. खाली उतरल्यानंतर अप्पर-डिप्पर का दिला नाही असे विचारत घुगे यांच्याशी वाद घातला तसेच या लोकांनी फोन करु न मानोरी गावातील काही लोकांना घटनास्थळावर बोलावले. त्यापैकी काही संशयितांनी घुगे यांना फायटरने मारहाण केली. व त्यांच्या खिशातील वीस हजार रु पयांची रक्कम काढुन घेतली. यावेळी घुगे यांना वाचविण्यासाठी आलेल्या अमोल धात्रक यांनाही मारहाण केल्याची फिर्याद दिंडोरी पोलीसात दिल्याने दहा संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The driver was beaten by a fighter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.