कोटंबी घाटात ट्रक अपघातात चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:49 IST2019-02-14T00:48:25+5:302019-02-14T00:49:53+5:30
पेठ : तालुक्यातील कोटंबी घाटातील एका अवघड वळणावर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने चालक जखमी झाले तर दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले.

कोटंबी घाटात ट्रक अपघातात चालक जखमी
नाशिक-पेठ महामार्गावर कोटंबी घाटात अपघातग्रस्त ट्रक.
पेठ : तालुक्यातील कोटंबी घाटातील एका अवघड वळणावर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने चालक जखमी झाले तर दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले.
मंगळवारी रात्री २ वाजेच्या सुमारास गुजरातकडून येणारा ट्रक कोटंबी घाटातील अवघड वळणावरून उतरत असताना व समोरून येणाऱ्या ट्रक यांच्यात धडक झाली. रात्रीच्या अंधारात घडलेल्या या अपघाताचा आवाज ऐकून शेजारच्या कोटंबी गावातील नागरिक धाऊन आले. जखमी चालकांना बाहेर काढत उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीविनहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, नाशिक - गुजरात राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.