कसारा घाटात दुचाकीच्या पिकअपला धडकेने चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 17:48 IST2018-12-23T17:47:11+5:302018-12-23T17:48:25+5:30
इगतपुरी : कसारा घाटात एक बाईक रायडरची उलट्या दिशेने येणाऱ्या पिकअपजोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना रविवारी (दि.२३) घडली.

कसारा घाटात दुचाकीच्या पिकअपला धडकेने चालक ठार
इगतपुरी : कसारा घाटात एक बाईक रायडरची उलट्या दिशेने येणाऱ्या पिकअपजोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना रविवारी (दि.२३) घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास लतीफवाडीजवळ बाईक रायडर (एम एच ०३ डी बी २४२२) नाशिककडे जोरदार जात असतांना उलट्या दिशेने येणाºया पिकप (एम एच १४ इ एम ९२२८) ला उजव्या बाजुस जोरदार धडक दिल्याने बाईक चालक अरविंद सुब्रमण्यम (मुबंई) याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यु झाला.
या वेळी तात्काळ मदतीला एन एल घोटी टोल प्लाझा रु ग्णवाहिका राजेंद्र मोरे, प्रवीण सोनवणे, नारायण वळकंदे, व पेट्रोलिंग टीम अनिल ठाकूर, धीरज सोनवणे, विजय कुंडगर, जाईद खान, दीपक शिंदे यांनी जखमीला इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अधिक तपास कसारा पोलीस करत आहे. (फोटो २३ कसारा)