ठिबक सिंचनाने वाढेल कांदा उत्पादन नागरे : सूक्ष्म जलसिंचन प्रोत्साहन प्रकल्पांर्गत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 18:07 IST2020-02-07T18:07:18+5:302020-02-07T18:07:33+5:30

सिन्नर : कांदा पिकाचे उत्पादन घेताना पाणी वाचिवण्यासाठी पीक उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी सूक्ष्म जलसिंचन पध्दतीचा वापर करावा असा सल्ला सदरवाडी येथील कृषी सहाय्यक नागरे यांनी दिला.

Drip irrigation will increase onion production in urban areas: guidance on micro irrigation promotion projects | ठिबक सिंचनाने वाढेल कांदा उत्पादन नागरे : सूक्ष्म जलसिंचन प्रोत्साहन प्रकल्पांर्गत मार्गदर्शन

ठिबक सिंचनाने वाढेल कांदा उत्पादन नागरे : सूक्ष्म जलसिंचन प्रोत्साहन प्रकल्पांर्गत मार्गदर्शन

सिन्नर : कांदा पिकाचे उत्पादन घेताना पाणी वाचिवण्यासाठी पीक उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी सूक्ष्म जलसिंचन पध्दतीचा वापर करावा असा सल्ला सदरवाडी येथील कृषी सहाय्यक नागरे यांनी दिला.
युवा मित्र संस्था व सिजेंटा इंडिया लि. च्या सहकार्याने सूक्ष्म जलसिंचन प्रोत्साहन प्रकल्प राबविण्यात येत आहे. ठिबकवरील कांदा लागवड-खत आणि किड व रोग व्यस्थापन तसेच कृषी विभागाच्या योजनांचा मार्गदर्शनासाठी प्रक्षेत्र भेट व पीक पाहणी कार्यक्र म सरदवाडी येथील उत्तम शिरसाठ यांच्या कांदा क्षेत्रात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
युवा मित्र संस्था २५ वर्शांपासून पाणी व्यवस्थापन, महिला उपजिविका, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अजित भोर, दिनेश ठोंबरे, सुधीर मोराडे उपस्थित होते.
मोराडे यांनी युवा मित्रतर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाची माहिती दिली. सिन्नर तालुक्यातील सततचा कमी पडणारा पाऊस व उपलब्ध पाण्याचे काटेकोरपणे वापर करणे, ठिबक सिंचन खालील क्षेत्र वाढविणे व उत्पादनात वाढ करणे या उद्देशाने १५ गावांध्ये २५० शेतकऱ्यांसोबत २५० एकरावर हा प्रकल्प करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Drip irrigation will increase onion production in urban areas: guidance on micro irrigation promotion projects

टॅग्स :onionकांदा