शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

एक लाखाच्या दागिन्यांवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:17 AM

‘मूळ कागदपत्रे आणि दागिनेसोबत आणा, तुम्हाला पेन्शन चालू करून देतो’ असे आमीष दाखवित भामट्याने एका ज्येष्ठ महिलेचे सुमारे एक लाख सात हजारांचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे.

नाशिक : ‘मूळ कागदपत्रे आणि दागिनेसोबत आणा, तुम्हाला पेन्शन चालू करून देतो’ असे आमीष दाखवित भामट्याने एका ज्येष्ठ महिलेचे सुमारे एक लाख सात हजारांचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संश्यित भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात ठक्कर बाजार व्यावसायिक संकुलात असलेल्या एका गाळ्याजवळ चांदवड येथील रहिवासी असलेल्या दिलारा इश्तियाक घासी (६५) या महिलेला संशयित भामट्याने बोलविले. तेथे अज्ञात व्यक्तीने घासी यांना एका रिक्षात बसविले. त्यांना विविध शासकीय योजनांची माहिती सांगत विश्वास संपादन करून पेन्शन सुरू करून देण्याचे आमीष दाखविले. त्यासाठी सुमारे एक लाख रुपये आवश्यक असल्याचे सांगत त्या ज्येष्ठ महिलेजवळील ७५ हजार रुपयांची तीन तोळे वजनाची सोनसाखळी, सात हजार रुपयांचे कानातील आभूषणे, १२ हजार ५०० रुपये किमतीची पाच ग्रॅमची सोन्याची पोत, तसेच पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असे एकूण १ लाख ७ हजार रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. अज्ञात भामट्याचे वर्णन महिला घाबरली असल्यामुळे सांगू शकलेली नाही. तसेच महिलेने रिक्षाचा क्रमांकदेखील बघितला नसल्याने या भामट्याची ओळख पटविणे अवघड होत आहे; मात्र अशाप्रकारे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींचा गोपनीय माहितीच्या आधारे शोध सुरू केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांनी दिली.

 

टॅग्स :Policeपोलिसtheftचोरी