वडाळा-पाथर्डी रस्त्यावर गटार
By Admin | Updated: May 7, 2014 22:28 IST2014-05-07T21:49:38+5:302014-05-07T22:28:41+5:30
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील मधुसूदन पार्कलगत भूमिगत गटारीच्या चेंबरमधून घाण व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वडाळा-पाथर्डी रस्त्यावर गटार
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील मधुसूदन पार्कलगत भूमिगत गटारीच्या चेंबरमधून घाण व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सुमारे सहा दिवसांपासून वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील बापू बंगला बसथांब्याजवळ असलेल्या मधुसूदन पार्कलगत भूमिगत गटारीच्या चेंबरमधून दुर्गंधीयुक्त पाणी दुतर्फा वाहत आहे. त्यामुळे त्या रस्त्यावरून दिवसभर शेकडोच्या संख्येने ये-जा करणारे वाहनधारक आणि परिसरात राहणार्या रहिवाशांना घाणीचा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नाक दाबून ये-जा करण्याची वेळ आल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वारंवार होणार्या भूमिगत गटारीच्या चेंबरमधून घाण आणि दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. (वार्ताहर)