शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. सुवर्णा वाजेंचा खून झाला की अपघात?; तपासानंतरही गूढ कायम, पतीची निर्दोष मुक्तता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 10:56 IST

पराकोटीला गेलेला कौटुंबिक कलहामुळे वाजे यांनी पत्नीचा खून केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता. त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

Nashik Murder Case: महापालिकेच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्य बहुचर्चित खून प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयात दोन दिवस चाललेल्या अंतिम सुनावणीअंती न्यायालयाने त्यांचे पती संशयित संदीप महादू वाजे (४२) व त्यांचा मावसभाऊ संशयित बाळासाहेब ऊर्फ यशवंत रामचंद्र म्हस्के (५१) यांची सबळ पुराव्यांअभावी जिल्हा व सत्र न्यायाधीश रूपेश राठी यांच्या न्यायालयाने सोमवारी (दि.१०) निर्दोष मुक्तता केली. तसेच न्यायालयाने ग्रामीण पोलिसांच्या तपासावर देखील ताशेरे ओढले आहेत. सुवर्णा वाजे यांचा खून झाला की अपघात, हा प्रश्न तपासाअंतीही कायम आहे.

सिडको येथील मनपाच्या स्वामी समर्थ रुग्णालयात कार्यरत तत्कालीन वैद्यकीय अधिकारी सुवर्णा संदीप वाजे (३८) या २५ जानेवारी २०२२ साली बेपत्ता झाल्या होत्या. यामुळे त्याच रात्री याप्रकरणी संदीप वाजे यांनी अंबड पोलिस ठाण्यात पत्नी सुवर्णा वाजे बेपत्ता झाल्याची तक्रारदेखील दिली होती. विल्होळीजवळच्या रायगडनगर येथे लष्कराच्या हद्दीच्या प्रवेशद्वार क्रमांक ३६ समोर वाडीवन्हे पोलिसांना २६ जानेवारी रोजी एक कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. ती कार (एमएच १५ डीसी ३८३२) वाजे यांची असल्याचे तपासात पुढे आले होते. मोटारीत आढळून आलेल्या मानवी हाडांचा डीएनएन हा सुवर्णा वाजेंचा असल्याचेही प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झाले होते. यासाठी पोलिसांनी वाजे यांच्या वडिलांचे डीएनएन नमुने घेतले होते. हे नमुने जुळले होते. पराकोटीला गेलेला कौटुंबिक कलहामुळे वाजे यांनी पत्नीचा खून केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता. त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

दोन दिवस युक्तिवादजिल्हा व सत्र न्यायालयात वाजे यांच्या खून प्रकरण खटल्याच्या अंतिम सुनावणीचा युक्तिवाद दोन दिवस चालला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सोमवारी (दि.१०) याप्रकरणी निकाल दिला. तीन वर्षे याबाबत न्यायिक प्रक्रिया सुरू राहिली. या निकालानंतर नाशिक ग्रामिण पोलिसांकडून उच्च न्यायालयात अपील केले जाणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकार पक्षाकडून २१ साक्षीदार तपासलेन्यायालयाने वाजे यांना या प्रकरणात सुरुवातीला चौदा दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. याप्रकरणी वाडीव-हे पोलिस व ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत ही कारवाई केली होती. यावेळी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या माहेरच्या नातेवाइकांचाही जबाब नोंदविण्यात आला होता. दरम्यान, सरकार पक्षाकडून न्यायालयात २१ साक्षीदार तपासण्यात आले. यावेळी सबळ पुरावे या गुन्ह्यात सरकार पक्षाला सादर करता आले नाही. यामुळे संशयित वाजे व म्हस्के यांची या गुन्ह्यातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली, अशी माहिती त्यांचे वकील राहुल कासलीवाल यांनी दिली आहे.

घातपात की अपघात? हा प्रश्न तीन वर्षांनंतरही कायमन्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी संदीप वाजे व म्हस्के यांची निर्दोष मुक्तता केली आहे. सुवर्णा वाजे यांचा मृत्यू घातपाताने झाला की अपघाताने? हे न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाही. या प्राथमिक बाबीची स्पष्टता न्यायालयात पोलिसांकडून होऊ शकली नाही. यामुळे सुवर्णा वाजे या त्यांच्या रुग्णालयातून ओपीडी आटोपून जेव्हा बाहेर पडल्या तेव्हा त्यांना जो व्यक्ती भेटला तो कोण होता? हेदेखील पोलिसांनी न्यायालयात सांगितले नाही. कारण हा अज्ञात व्यक्त्ती वाजे यांना मृत्यूपूर्वी भेटलेला शेवटचा व्यक्ती होता. 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय