डॉ. शशिताई अहिरे यांची सहकार भारतीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 00:55 IST2021-10-04T00:54:49+5:302021-10-04T00:55:21+5:30

नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या अध्यक्ष डॉ. शशिताई अहिरे यांची सहकार भारतीच्या प्रदेश अध्यक्षपदी आळंदी येथील अधिवेशनात निवड झाली. सहकार भारतीचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख भालचंद्र कुलकर्णी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

Dr. Shashitai Ahire elected as State President of Sahakar Bharati | डॉ. शशिताई अहिरे यांची सहकार भारतीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

डॉ. शशिताई अहिरे यांची सहकार भारतीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

नाशिक : नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या अध्यक्ष डॉ. शशिताई अहिरे यांची सहकार भारतीच्या प्रदेश अध्यक्षपदी आळंदी येथील अधिवेशनात निवड झाली. सहकार भारतीचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख भालचंद्र कुलकर्णी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. महामंत्री अर्थात महासचिव म्हणून नागपूरचे विवेक जुगाधे यांचीही निवड झाली. त्रैवार्षिक अधिवेशनात कार्यकारिणीने ही निवड केली. डॉ. शशिताई अहिरे आणि विवेक जुगाधे यांच्या नावाला कार्यकारिणीने एकमताने मंजुरी दिली.

मावळते अध्यक्ष डॉ. मुकुंदराव तापकीर आणि महामंत्री विनय खटावकर यांनी गेल्या चार वर्षात केलेल्या कामाबद्दल कार्यकारिणीने कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. शशिताई अहिरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, सहकार भारतीचे तत्त्व ‘विना संस्कार नहीं सहकार, बिना सहकार नही उद्धार’ हे आहे. त्या नुसार प्रत्येक जिल्ह्यात सहकाराच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करणे, विविध कार्यकारी सोसायट्या बळकट करणे, प्रत्येक तालुक्यात किमान दोन कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारणे, बँका सुसंस्कारित करणे हे आपले उद्दिष्ट राहील, असे डॉ अहिरे यांनी सांगितले.

Web Title: Dr. Shashitai Ahire elected as State President of Sahakar Bharati