पिंपळनारे येथे डॉ. आंबेडकर यांची जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 19:01 IST2021-04-14T19:01:05+5:302021-04-14T19:01:36+5:30
वणी : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची १३० वी जयंती दिंंडोरी तालुक्यातील पिंपळनारे गावात राजवाडा येथे साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली.

पिंपळनारे येथे डॉ. आंबेडकर यांची जयंती
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन
वणी : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची १३० वी जयंती दिंंडोरी तालुक्यातील पिंपळनारे गावात राजवाडा येथे साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करत पिंपळनारे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्रावण वाघचौरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य युवराज साळुंखे, सागर साळवे, सुरेखा साळवे, सविता साळवे, माजी सरपंच रमणलाल साळवे, संगीता साळवे, ताई साळवे, आकाश साळवे, बाळू गांगुर्डे, सोनाली साळवे आदींच्या उपस्थितीत प्रार्थना सादर करण्यात येऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. (१४ वणी)