डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या बरगड्या कशा तुटल्या ? घातपाताचा संशयाला बळ : मृत्यूचे गूढ आणखी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 12:40 AM2021-08-21T00:40:06+5:302021-08-21T00:41:31+5:30

नाशिक : आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये दोन दिवसांपूर्वी संशयास्पदरीत्या मृत्यू झालेल्या डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या दोन बरगड्या तुटल्याचे शवविच्छेदनादरम्यान समोर आल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. शिंदे कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या घातपाताचा संशयालाही बळ मिळाले असून, डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या बरगड्या कशा तुटल्या, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

Dr. How did Swapnil Shinde's ribs break? Suspicion of assassination: Mystery of death increased | डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या बरगड्या कशा तुटल्या ? घातपाताचा संशयाला बळ : मृत्यूचे गूढ आणखी वाढले

डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या बरगड्या कशा तुटल्या ? घातपाताचा संशयाला बळ : मृत्यूचे गूढ आणखी वाढले

Next

नाशिक : आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये दोन दिवसांपूर्वी संशयास्पदरीत्या मृत्यू झालेल्या डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या दोन बरगड्या तुटल्याचे शवविच्छेदनादरम्यान समोर आल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. शिंदे कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या घातपाताचा संशयालाही बळ मिळाले असून, डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या बरगड्या कशा तुटल्या, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केलेला असतानाच शवविच्छेदनादरम्यान डॉ. शिंदे यांच्या छातीच्या पिंजऱ्याच्या दोन बरगड्या तुटलेल्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिंदे कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या घातपाताच्या संशयाला बळ मिळाले आहे. मात्र बरगड्या तुटून हृदय किंवा फुप्फुसासारख्या अंतर्गत भागापर्यंत कोणतीही जखम आढळून आलेली नाही. त्यामुळे ही जखम आयसीयूतील अंतर्गत उपचारादरम्यान झाली असल्याची शक्यताही डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस तपासात काय वास्तव समोर येते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, याप्रकरणी आडगाव पोलिसांनी सुरुवातीला ह्यअकस्मात मृत्यूह्णची नोंद केली होती. परंतु, त्यांच्या वडिलांनी डॉ. स्वप्निल यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर दोन महिला साथीदारांकडून त्याचा वारंवार छळ होत असल्याची तक्रार करीत संबंधित दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे पोलिसांनी संशयित महिला डॉक्टरांसह वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडे चौकशी सुरू केली असली तरी शुक्रवारी सायंकाळपर्यंत या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

-

व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबला पाठवला
स्त्रीरोगतज्ज्ञ विभागात एमडी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात असलेले डॉ. स्वप्निल यांचा मृतदेह महाविद्यालयातील ऑपरेशन थिएटरलगत असलेल्या वॉशरूममध्ये आढळून आल्याने त्यांचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते.

मात्र आता शवविच्छेदनातून समोर आलेल्या संशयास्पद बाबींमुळे डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. या शवविच्छेदनाचा व्हिसेरा जिल्हा शासकीय रुग्णालयाने पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवला आहे.

Web Title: Dr. How did Swapnil Shinde's ribs break? Suspicion of assassination: Mystery of death increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.