डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर कोनशिला बसविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 00:20 IST2019-09-14T00:20:04+5:302019-09-14T00:20:24+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास कोनशिला बसवावी व कारंजे सुरू करावे या मागणीसाठी नाशिकरोड ब्लॉक काँग्रेसतर्फे मनपाच्या निषेधार्थ घोषणा देत निदर्शने करण्यात आली.

डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर कोनशिला बसविण्याची मागणी
नाशिकरोड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास कोनशिला बसवावी व कारंजे सुरू करावे या मागणीसाठी नाशिकरोड ब्लॉक काँग्रेसतर्फे मनपाच्या निषेधार्थ घोषणा देत निदर्शने करण्यात आली.
नाशिकरोड बसस्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चबुतऱ्यावर कोनशिला बसविण्यात यावी, बंद असलेले कारंजे सुरू करावे या मागणीसाठी नाशिकरोड ब्लॉक कॉँग्रेसच्या वतीने शुक्रवारी दुपारी महापालिकेच्या निषेधार्थ घोषणा देत निदर्शने करून महापालिका विभागीय अधिकारी नितीन नेर
यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात नाशिकरोड ब्लॉक कॉँग्रेसच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या आहे.
निदर्शने आंदोलनात नाशिकरोड ब्लॉक कॉँग्रेसचे अध्यक्ष दिनेश निकाळे, सरचिटणीस कामील इनामदार, डॉ.सुरेश पाटील, कुसुम चव्हाण, अरूणा आहेर, गौतम सोनवणे, दिपक ठाकुर, मीरा गायकवाड, सुनिल रिपोर्टे, शकुंतला त्रिवेदी, गंगाधर बागुल आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.