Dr Ambedkar's cleanliness in Trimbakeshwar! | त्र्यंबकेश्वरच्या डॉ.आंबेडकर नगरातील स्वच्छतागृहाची दुरवस्था !

त्र्यंबकेश्वरच्या डॉ.आंबेडकर नगरातील स्वच्छतागृहाची दुरवस्था !

ठळक मुद्देहे स्वच्छतागृह १९५६ सालात तत्कालीन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बांधण्यात आले

त्र्यंबकेश्वर : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची अत्यंत वाईट अवस्था झाली असुन स्वच्छतागृहाचा परिसर पुर्ण झाडी-झुडपाने भरला आहे. त्यामुळे ते जाण्याकरीता रस्ता देखील दिसत नाही. चारही खोल्यांना दरवाजे नाहीत. भांडी देखिल नाहीत. त्यामुळे या स्वच्छतागृहाची अत्यंत दयनीय अवस्था आहे.
हे स्वच्छतागृह १९५६ सालात तत्कालीन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बांधण्यात आले होते. या स्वच्छतागृहाचे आयुष्य केव्हाच संपले आहे. गावातील सर्वच्या सर्व स्वच्छतागृहाचे नुतनीकरणच नव्हे तर विस्तारीकरणही केले आहे. मात्र या स्वच्छतागृहाचे नुतनीकरन अथवा विस्तारीकरण अद्याप न केल्याने पीिसरातील नागरीक, रहिवासी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
आजच्या परिस्थितीत या स्वच्छतागृहाचे छत केव्हा कोसळेल याचा भरवसा नाही. आणि कोसळले तर गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी लवकरात लवकर या स्वच्छतागृहाची सुधारणा करावी अशी मागणी केली जात आहे.
(फोटो २२ टीबीके, २२ टीबीके १)

Web Title: Dr Ambedkar's cleanliness in Trimbakeshwar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.