नाशिकरोड परिसरात डॉ़ आंबेडकर जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 01:10 IST2019-04-17T01:09:43+5:302019-04-17T01:10:08+5:30

परिसरातील विविध संस्था, सोसायटी आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 Dr Ambedkar Jayanti excited in Nashik Road area | नाशिकरोड परिसरात डॉ़ आंबेडकर जयंती उत्साहात

नाशिकरोड परिसरात डॉ़ आंबेडकर जयंती उत्साहात

नाशिकरोड : परिसरातील विविध संस्था, सोसायटी आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  देवी चौक येथील महाकर्मभूमी बुध्दविहार ट्रस्टच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रतिमापूजन अ‍ॅड. सुनील मराठे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बुध्दविहार ट्रस्टचे अध्यक्ष विलास गांगुर्डे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश बागुल, भारतीय बौध्द महासेभेचे शहर अध्यक्ष प्रवीण बागुल, सरचिटणीस चारूदत्त भालेराव, माणिक साळवे, रविकांत भालेराव, अमोल घोडे, बाळासाहेब पगारे, विकास पगारे, प्रभाकर कांबळे, संतोष धोत्रे आदी उपस्थित होते.
संत आईसाहेब विद्यालय
पळसे येथील संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी सुमित्रा वाडेकर व संतोष गायधनी यांचे आंबेडकर यांच्या जीवनावर व्याख्यान झाले. विद्यार्थी मंचने आंबेडकरांच्या जीवनावर विविध गिते सादर केली. श्रावणी गायखे हीने रमाई यांच्यावर एकपात्री नाटक तर मानसी गायधनी हीने ‘मी आंबेडकर बोलतोय’ यावर भाषण केले. बी. बी. थोरात यांनी आंबेडकर यांचा जीवनपट उलगडून सांगितला. अध्यक्षस्थान सृष्टी सरोदे हीने भूषविले. सूत्रसंचालन धनश्री सोनवणे व आभार नीलिमा वाघ हीने मानले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे, अशोकराव गायधनी, रामदास गायधनी, रमेश मोरे, चंद्रभान आगळे, विनोद ढेरिंगे, लक्ष्मण जाधव, नाना सरोदे, मुख्याध्यापक टी.के. गाडे, एस. व्ही. बोरसे, एम. डी. संधान, एस. ए. जाधव, व्ही. वाय. पवार आदी उपस्थित होते

Web Title:  Dr Ambedkar Jayanti excited in Nashik Road area