डॉ. अजिंक्य वैद्य यांचे हृदयविकाराने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:09 IST2020-07-31T22:42:45+5:302020-08-01T01:09:19+5:30

सिन्नर : तालुक्यातील वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व चार महिन्यापासून कोरोनायोद्धा म्हणून उत्कृष्ट सेवा बजावलेले डॉ. अजिंक्य अनिल वैद्य (३२) यांचे शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

Dr. Ajinkya Vaidya dies of heart attack | डॉ. अजिंक्य वैद्य यांचे हृदयविकाराने निधन

डॉ. अजिंक्य वैद्य यांचे हृदयविकाराने निधन


सिन्नर : तालुक्यातील वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व चार महिन्यापासून कोरोनायोद्धा म्हणून उत्कृष्ट सेवा बजावलेले डॉ. अजिंक्य अनिल वैद्य (३२) यांचे शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. डॉ. वैद्य हे वावी
प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते. सिन्नर येथील रहिवासी अजिंक्य यांना सकाळी ८ वाजेच्या सुमारास छातीत चमक आल्याने कुटुंबीयांनी नाशिक येथील खासगी दवाखान्यात दाखल केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Dr. Ajinkya Vaidya dies of heart attack