चांदोरी येथे घरोघरी जाऊन तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 00:57 IST2021-04-29T22:48:19+5:302021-04-30T00:57:35+5:30

चांदोरी : येथील आशा सेविकांमार्फत संपूर्ण गावातील नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

A door-to-door inspection at Chandori | चांदोरी येथे घरोघरी जाऊन तपासणी

चांदोरी येथे घरोघरी जाऊन तपासणी

ठळक मुद्देमाझे कुटुंब, माझी जबाबदारी योजनेंतर्गत ही तपासणी सुरू

चांदोरी : येथील आशा सेविकांमार्फत संपूर्ण गावातील नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपालिकेच्या वतीने चांदोरी गावात माझे कुटुंब, माझी जबाबदारी योजनेंतर्गत ही तपासणी सुरू आहे.
निफाड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चांदोरी हे हॉटस्पॉट ठरत आहे. त्यामुळे ग्रामपालिका प्रशासनाने संपूर्ण गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी लसीकरणाबाबतही जागृती केली जात आहे. या सर्वेक्षणासाठी चांदोरी येथील स्नेहल भोज, अनुजा गडाख, मीना पतंगराव, रत्ना गाडेकर, सुषमा वाटरे, सांगीता वारघडे, अनिता बागुल, सुनीता बागुल, मनीषा कुमावत आदी आशा सेविका काम करीत आहेत.

 

Web Title: A door-to-door inspection at Chandori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.