नाशिक- सध्या औरंगाबादचे संभाजी नगर असे नामांतर करण्यावरून राज्यातील सत्तारूढ आघाडीतच काँग्रेस आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगल असला तरी सरकार अडचणीत येईल इतकाही वाद ताणू नका असा ज्येष्ठत्वाचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उदघाटन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बेालत होते. सध्या नामांतरावरून सेना आणि कॉंग्रेसकडून वादग्रस्त विधाने येत असून त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा सल्ला दिला आहे. वादग्रस्त सीमारेषेवरही भुजबळ यांनी कर्नाटक सरकारवर टीका केली. बेळगाव येथे मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार दडपशाही करीत आहे. त्यामुळे हा भाग केंद्रशासित म्हणून घोषीत करावा अशी सूचनाही त्यांनी केली तर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्कार प्रकरणाच्या आरोपानंतर त्यांनी आधी चौकशी तर हेाऊ द्या मग पक्ष निर्णय घेईल असे सांगिले.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारातील सर्वच घटक पक्षांनी स्वबळाची भाषा केली महाविकास आघाडी होणं कठीण आहे, असेही ते म्हणाले.
नामांतरावरून सरकार अडचणीत येईल इतकेही भांडू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 13:06 IST
नाशिक- सध्या औरंगाबादचे संभाजी नगर असे नामांतर करण्यावरून राज्यातील सत्तारूढ आघाडीतच काँग्रेस आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगल असला तरी सरकार अडचणीत येईल इतकाही वाद ताणू नका असा ज्येष्ठत्वाचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.
नामांतरावरून सरकार अडचणीत येईल इतकेही भांडू नका!
ठळक मुद्दे छगन भुजबळ यांचा सल्लाबेळगावला केंद्रशासित प्रदेश घोषीत करा