दिंडोरीत डॉक्टरची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 00:30 IST2019-12-21T00:29:51+5:302019-12-21T00:30:11+5:30
दिंडोरी येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सुनील वामनराव पवार (५२) यांनी त्यांच्या हॉस्पिटलच्या वरील खोलीमध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

दिंडोरीत डॉक्टरची आत्महत्या
दिंडोरी : येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सुनील वामनराव पवार (५२) यांनी त्यांच्या हॉस्पिटलच्या वरील खोलीमध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
पालखेड रोड येथील आशीर्वाद हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुनील पवार यांनी गुरु वारी (दि. १९) सायंकाळी हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावरील खोलीत विष प्राशन करून आत्महत्या केली. मात्र आत्महत्याचे कारण समजू शकले नाही. गुरु वारी सायंकाळी त्यांचा मोबाईल लागत नसल्याने त्यांच्या पत्नीने दिंडोरीत विचारपूस केली असता हास्पिटल बंद असल्याचे समजले. त्यानंतर त्या दिंडोरीत आल्या व अधिक तपास केला असता हॉस्पिटलच्या वरील बंद खोलीत ते आढळले. त्यांना येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़