नाशिकरोड : लग्नात हुंडा दिला नाही, या कारणावरून डॉक्टर महिलेचा शारीरिक, मानसिक छळ करून लग्नात दिलेल्या ४०० ग्रॅम सोन्याचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपनगर आशर इस्टेट येथे राहणाऱ्या डॉ. दीपिका आनंद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विवाहानंतर सासू आशा अमृत पाटील व पती आनंद अमृत पाटील यांनी माझा मानसिक, शारीरिक छळ करून वेळोवेळी उपाशी ठेवून मारहाण केली. वडिलांनी लग्नात दिलेल्या ४०० ग्रॅम सोन्याच्या दागिन्याचा परस्पर अपहार करून मला दवाखान्यात जाण्यास बंदी केली. तसेच दवाखान्यात गेल्यास जिवे ठार मारण्याची त्यांनी धमकी दिली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Doctor woman tortured
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.