सिडको : उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णावर शारीरिक तपासणीच्या नावाखाली शिवाजी चौकातील एका संशयित डॉक्टरने लैंगिक अत्याचारप्रकरणी केल्याचा गुन्हा अंबड पोलिसांनी दाखल केला आहे. संशयित डॉ. नितीन विजय गावंडे (४४, रा. इंदिरानगर) यास पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिडको परिसरातील शिवाजी चौकातील दवाखान्यात महिला रुग्ण आॅक्टोबरपासून १४ नोव्हेंबरपर्यंत उपचार घेत होती. दरम्यान, संशयित गावंडे यांनी महिलेसोबत सलाईन लावण्याच्या बहाण्याने जवळीक साधली. ‘पोटात सूज आली आहे, त्यामुळे मला आतून तपासावे लागेल’ असे सांगून शरीराच्या नको त्या अवयवांसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच संशयिताने पीडित महिलेशी अश्लील भाषेत लैंगिक शारीरिक संबंधाबाबत संवाद साधत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. अंबड पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरून संशयित डॉक्टरविरुद्ध विनयभंग व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी गावंडे याला अटक केली आहे.
लैंगिक अत्याचार प्रकरणी डॉक्टरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 01:33 IST
उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णावर शारीरिक तपासणीच्या नावाखाली शिवाजी चौकातील एका संशयित डॉक्टरने लैंगिक अत्याचारप्रकरणी केल्याचा गुन्हा अंबड पोलिसांनी दाखल केला आहे.
लैंगिक अत्याचार प्रकरणी डॉक्टरला अटक
ठळक मुद्देमहिला रुग्णाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल