शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

नाशिक चे तत्कालीन जिल्हाधिकारी जॅक्सनविषयी आपणांस या गोष्टी माहीत आहे का?

By azhar.sheikh | Updated: December 21, 2017 16:01 IST

इंग्रज राजवटीमध्ये भारतीय शासकिय सेवेत अधिकारी पदावर असलेले आॅर्थर मेसन टिप्पेट्स जॅक्सन हे १९०९ सालापर्यंत नाशिकच्या जिल्हाधिकारी पदावर होते. १९१० सालापासून ते मुंबईच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारणार होते. हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी नाशिकच्या ‘विजयानंद’ सिनेमागृहात गोळ्या घालून हत्त्या केली होती.

ठळक मुद्दे १८ वर्षीय हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी नाशिकच्या ‘विजयानंद’ सिनेमागृहात गोळ्या घालून हत्त्या केली त्यांच्या पार्थिवाचे दफन नाशिकच्या सारडा सर्कल परिसरातील ख्रिस्ती कब्रस्तानात कबरीवर जॅक्सन यांचे पूर्ण नाव, जन्म व मृत्यूचा दिनांक व जिल्हाधिकारी नाशिक, अशी माहिती

अझहर शेख : नाशिक : इंग्रज राजवटीमध्ये भारतीय शासकीय सेवेत अधिकारी पदावर असलेले आॅर्थर मेसन टिप्पेट्स जॅक्सन हे १९०९ सालापर्यंत नाशिकच्या जिल्हाधिकारी पदावर होते. १९१० सालापासून ते मुंबईच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार होते. २१ डिसेंबर १९०९ साली जॅक्सन यांची मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी असलेले १८ वर्षीय हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी नाशिकच्या ‘विजयानंद’ सिनेमागृहात गोळ्या घालून हत्त्या केली होती.जॅक्सन यांच्या हत्त्येमागे काय होते कारण?स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकर यांच्याविरुद्धचा खटला आणि अटकेबाबत जॅक्सन यांची भूमिका महत्त्वाची राहिली होती. बाबाराव यांच्यावर राष्टÑविरोधी घोषणाबाजीचा खटला त्यावेळी भरण्यात आला होता. याचा बदला म्हणून जॅक्सन यांची कान्हेरे यांनी हत्त्या केली. जॅक्सनच्या हत्त्येचा कट शिजविला गेला होता आणि १९१० या वर्षाच्या पहिल्या महिन्यात हत्त्या करण्याचा निर्णय झाला होता.कोठे आहे ते ‘विजयानंद’ :‘विजयानंद’ हे सिंगल पडदा सिनेमागृह आहे. या सिनेमागृहाला मोठा इतिहास लाभलेला असून, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी या सिनेमागृहाचा वापर केला आहे. हे सिनेमागृह मूळ नाशिक अर्थात जुने नाशिकमधील भद्रकाली परिसरात आहे. आजही या सिनेमागृहात चित्रपटांचे शो होतात. चित्रपटसृष्टीचा जन्म आणि इंग्रज राजवटीमधील जॅक्सन हत्येचा साक्षीदार विजयानंद सिनेमागृह आहे.जॅक्सन यांची कबर नाशिकमध्येच !जॅक्सन यांचा वध १९०९ साली झाला. यावेळी त्यांच्या पार्थिवाचे दफन नाशिकच्या सारडा सर्कल परिसरातील ख्रिस्ती कब्रस्तानात करण्यात आले. त्यांची कबर आजही या कब्रस्तानात पहावयास मिळते. सदर कबरीवर जॅक्सन यांचे पूर्ण नाव, जन्म व मृत्यूचा दिनांक व जिल्हाधिकारी नाशिक, अशी माहिती इंग्रजीमधून लिहिण्यात आली आहे. सदर कब्रस्तानदेखील बिटिश राजवटीचे साक्षीदार आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय