शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

‘थॅलेसेमिया’च्या लढ्यात एकटे समजू नका :  विजी व्यंकटेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:42 IST

थॅलेसेमिया असो की कॅन्सर अशा कुठल्याही दुर्धर आजाराशी लढा देताना कधीही स्वत:ला एकटे समजू नये. आपण एकाकीपणे या आजाराशी झुंज देत आहोत, असा गैरसमज मनातून काढून टाकावा. समाजातील संवेदनशील मनाचे अनेक हात मदतीसाठी उभे आहेत, असे प्रतिपादन मॅक्स फाउण्डेशनच्या विभागप्रमुख व ‘बिर्इंग ह्युमन’च्या विश्वस्त विजी व्यंकटेश यांनी केले.

नाशिक : थॅलेसेमिया असो की कॅन्सर अशा कुठल्याही दुर्धर आजाराशी लढा देताना कधीही स्वत:ला एकटे समजू नये. आपण एकाकीपणे या आजाराशी झुंज देत आहोत, असा गैरसमज मनातून काढून टाकावा. समाजातील संवेदनशील मनाचे अनेक हात मदतीसाठी उभे आहेत, असे प्रतिपादन मॅक्स फाउण्डेशनच्या विभागप्रमुख व ‘बिर्इंग ह्युमन’च्या विश्वस्त विजी व्यंकटेश यांनी केले.  अर्पण थॅलेसेमिया सोसायटी व एच.सी.जी. मानवता कॅन्सर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसेमियाग्रस्त बालक व त्यांच्या पालकांसाठी आयोजित ‘दिवाळी मेळा’ व ‘बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट’ केंद्राच्या शुभारंभप्रसंगी बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अभिनेत्री शिल्पा शिंदे, डॉ. राज नगरकर, अर्पण सोसायटीचे अध्यक्ष नरेंद्र शाह, सचिव नंदकिशोर तातेड, डॉ. अतुल जैन, डॉ. गिरीश बदारखे, डॉ. नीलेश वासेकर आदी उपस्थित होते. या केंद्रात भौतिक व वैद्यकीय अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या केंद्रात सात ते दहा खाटा असून, कें द्रात बदारखे, वासेकर हे तज्ज्ञ डॉक्टर थॅलेसेमियाग्रस्त बालकांवर मोफत उपचार करणार असल्याचे यावेळी नगरकर यांनी सांगितले. यावेळी शिल्पा शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, बॉलिवूडमध्ये सगळेच ‘हिरो’ असतात असे नाही तसेच वैद्यकीय क्षेत्रातदेखील सगळेच डॉक्टर ‘हिरो’ नसतात. जे समाजाच्या संवेदनांची जाणीव ठेवून वैद्यकीय पेशासोबत प्रामाणिक राहून कर्तव्य बजावतात तेच खरे ‘हीरो’ ठरतात. थॅलेसेमिया हा आजार रक्ताशी संबंधित असून, यासाठी मी रक्तदान वेळोवेळी करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी माझ्या रक्ताची मात्रा अधिक चांगली टिकवून ठेवण्याकरिता मी योग्य व पौष्टिक आहार व व्यायामावर भर देत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शिंदे, व्यंकटेश यांचे स्वागत थॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या हस्ते करण्यात आले. उच्चशिक्षण घेत यशोशिखर सर करणाऱ्या थॅलेसेमियाग्रस्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविक नगरकर यांनी केले.अत्याचाराविरुद्ध वेळीच आवाज उठवावा : शिंदेअन्याय-अत्याचाराविरुद्ध वर्षानुवर्षे गप्प राहून त्यानंतर ‘मी-टू’सारख्या चळवळीचा जन्म होण्याची प्रतीक्षा करणे योग्य नाही. अन्याय व अत्याचाराविरुद्ध वेळीच आवाज उठविणे गरजेचे आहे. समाजाच्या विकासासाठी ‘मी-टू’ चळवळ राबविली गेली पाहिजे. समाजातील विविध घटकांना मदतीच्या हातांची गरज आहे, त्याचा विचार करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

टॅग्स :docterडॉक्टरNashikनाशिक