शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

तात्पुरते स्थलांतर नको, संरक्षक भिंतच हवी

By admin | Updated: August 3, 2014 01:57 IST

तात्पुरते स्थलांतर नको, संरक्षक भिंतच हवी

 

नाशिक : अनेक निवडणुका आल्या अन् गेल्या मात्र आम्ही व आमचे कुटुंब असुरक्षितच राहिले. काहींचा संसार मातीमोल झाला. शहराच्या विविध नेत्यांकडून काझी गढीला अनेकदा वळसाही घातला गेला; मात्र अद्याप महापालिका प्रशासनाला गढीला संरक्षक भिंत बांधण्याला मुहूर्त मिळत नाही हे दुर्दैव असून, संरक्षक भिंत हेच आमचे स्वप्न आहे, अशा भावना गढीच्या रहिवासी महिलांनी बोलून दाखविल्या.‘आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या गढीवर वास्तव्यास असून, आमचे बालपणदेखील येथेच गेले व आमची मुलेही गढीवरच लहानाची मोठी झाली’, ‘आम्ही आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर असून, उतारवयात कोठे जायचं’ असा प्रश्न उपस्थित करत गढीच्या रहिवाशांनी स्थलांतरास तीव्र विरोध दर्शविला असून जोपर्यंत लेखी स्वरूपात महापालिकेकडून आश्वासन मिळत नाही तोपर्यंत स्थलांतर करणार नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे असून तात्पुरता नव्हे तर कायमस्वरूपी निवारा हवा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. दरवर्षी येथील रहिवाशांना घरपट्ट्या दिल्या जातात. यंदा वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच मनपाच्या कर्मचाऱ्यांनी घरपट्ट्या आणून दिल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. जोपर्यंत गढी पूर्णपणे संरक्षक भिंतीने सुरक्षित केली जात नाही तोपर्यंत घरपट्टीची रक्कम भरणार नाही, असा आक्रमक पवित्रा रहिवाशांनी घेतला आहे. केवळ पावसाळ्यात जीवितहानीचा धोका दाखवून नोटिसा बजावण्यापलीकडे कोणत्याही उपाययोजना करत नसल्याचा आरोप चंद्रकला नागपुरे, रंजना काथवटे, संगीता निरभवणे, सोन्याबाई खैरनार, बेबी खैरनार, कमल पगारे आदि महिलांनी केला आहे. (प्रतिनिधी)