दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणास मारहाण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:41 IST2017-08-12T23:41:09+5:302017-08-12T23:41:17+5:30

दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणास मारहाण!
नाशिक : दारू पिण्यासाठी तीनशे रुपये देत नाही, या कारणावरून चौघा संशयितांनी एका तरुणास बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी (दि़१०) सकाळी म्हसरूळच्या संभाजी चौकात घडली़ गौरव बबन पेंढारकर (२०, वडजे गल्ली, म्हसरूळ) असे मारहाण करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव पेंढारकर हा युवक सकाळी आठ वाजेच्या सुमारास संभाजी चौकातून पायी जात होता़ त्यास संशयित मुन्ना ऊर्फ राजेंद्र बोंबले व त्याचे तीन अल्पवयीन साथीदार (सर्व रा. म्हसरूळ) यांनी अडविले व दारू पिण्यासाठी तीनशे रुपयांची मागणी केली़ पैसे देण्यास नकार देताच संशयितांनी गौरव याला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़ तर संशयित मुन्ना बोंबले याने लोखंडी सळई डोक्यात मारून जखमी केले़
या प्रकरणी गौरव पेंढारकर याच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़