शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

५५ वर्षावरील शिक्षकांना प्रत्यक्ष शाळेत बोलावू नका ; वर्क फ्रॉम होमची सवलत देण्याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 15:23 IST

शाळा सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला असून शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत काही शैक्षणिक संस्था व शाळांकडून जबरदस्ती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शिक्षकांनी शाळांमध्ये कसे व कधी उपस्थित रहावे यासाठी शैक्षणिक संस्थांना व शाळांना शिक्षण विभागाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महिला शिक्षक, मधुमेह, श्वसनाचे विकार असलेले, रक्तदाब, हृदयविकार आदी आजार असलेले व ज्यांचे वय ५५ वर्षावर आहे, अशा शिक्षकांना प्रत्यक्ष शाळेत बोलावू नये अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

ठळक मुद्देज्येष्ठ शिक्षक, आजाराने ग्रस्तांना वर्क फ्रॉम होमची सवलत आठवड्यात एक किंवा दोनच शिक्षकांना शाळेत बोलविण्याचा सल्ला

नाशिक : लॉकडाऊन शिथिल होणार असल्यामुळे शाळा सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला असून शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत काही शैक्षणिक संस्था व शाळांकडून जबरदस्ती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शिक्षकांनी शाळांमध्ये कसे व कधी उपस्थित रहावे यासाठी शैक्षणिक संस्थांना व शाळांना शिक्षण विभागाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महिला शिक्षक, मधुमेह, श्वसनाचे विकार असलेले, रक्तदाब, हृदयविकार आदी आजार असलेले व ज्यांचे वय ५५ वर्षावर आहे, अशा शिक्षकांना प्रत्यक्ष शाळेत बोलावू नये अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. स्थानिक प्रशासनाच्या संमतीशिवाय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकाºयांनी शाळा सुरु करण्याबाबत व शिक्षक उपस्थितीबाबत कोणत्याही सूचना देऊ नये, शाळा सुरु करण्याची तयारी आणि ई लर्निंगसाठी मुख्याध्यापकांनी आवश्यकता असल्यास शिक्षकांना आठवड्यातून दोन दिवस बोलावल्यास शिक्षकांनी उपस्थित राहणे गरजेचे असल्याचेही या पत्रकातून सूचित करण्यात आले आहे. विविध जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध राहणार असल्याने शिक्षकांना शाळांमध्ये उपस्थित राहण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. ही अडचण लक्षात घेऊन शिक्षकांना वर्क प्रॉम होम करू देण्याची सवलत द्यावी,असे शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आाले आहे.

 ऑनलाईन शिक्षणप्रक्रियेत उपयोग करून घ्याएकाच दिवशी सर्वांना न बोलावता आठवड्याातून एक किंवा दोनच शिक्षकांना वालवावे, इतर आस्थापनेवर नियुक्ती करण्यात आलेल्या सरप्लस  शिक्षकांना मूळ शाळेत बोलावून त्यांचा ऑनलाईन शिक्षणप्रक्रियेत उपयोग करून घ्यावा, त्याचप्रमाणे क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरातीला शाळा मुख्याध्यापकाच्या ताब्यात येईपर्यंत तेथील कोणत्याही शिक्षकाला शाळेत बोलावून घेऊ असे स्पष्ट निर्देश  शाळांना देण्यात आले आहेत.

कोरोना डयुटीतून मुक्त करा कोरोना विरोधी लढ्यात शिक्षकांना रेशन दुकाने, चेक पोस्ट, कोरोना सर्वेक्षण अशा ठिकाणी काम देण्यात आले आहे. या शिक्षकांना आधी कोरोना सेवेतून मुक्त करावे तरच ते आॅनलाईन शिक्षण घेण्यासाठी पूर्णवेळ देऊ शकतील अशी मागणी शिक्षक करत आहेत. त्यामुळे शिक्षणाधिकाºयांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून त्यांना कार्यमुक्त करून घेण्याची कार्यवाही करण्याच्या सुचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकTeacherशिक्षकSchoolशाळा