थकीत बिलाच्या वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 00:50 IST2021-03-16T21:50:33+5:302021-03-17T00:50:35+5:30
येवला : थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडणे तत्काळ थांबवावे तसेच चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी प्रहार संघटनेने प्रांताधिकारी सोपान कासार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

थकीत बिलाच्या वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडू नका
येवला : थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडणे तत्काळ थांबवावे तसेच चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी प्रहार संघटनेने प्रांताधिकारी सोपान कासार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
थकीत वीजबिलापोटी शेतीपंपाची वीज तोडण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. यास शेतकऱ्यांसह विविध संघटनांचा विरोध आहे. शासनाने ही मोहीम त्वरित थांबवावी असे निवेदनात म्हटले आहे. वीजवसुली मोहीम अनैतिक असून कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन का तोडण्यात आली याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता अरेरावी करीत शेतकऱ्यांवर ३५३ सारखे गुन्हे दाखल करून न्याय मागणाऱ्यांचीच मुस्कटदाबी केली जात आहे. चांदवडच्या शेतकऱ्यांवरील खोटे गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणीही सदर निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, जनशक्ती पक्षाचे अमोल फरताळे, संघटक किरण चरमळ, उपाध्यक्ष वसंतराव झांबरे, शंकर गायके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्रावण देवरे, नवनाथ लभडे, प्रहारचे बापू शेलार, रामभाऊ नाईकवाडे, सुनील पाचपुते, गोरख निर्मळ, बाळासाहेब बोराडे, जनार्दन गोडसे, धनंजय खरोटे यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.