आठ रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:42 AM2018-09-28T00:42:27+5:302018-09-28T00:43:24+5:30

सिन्नर तालुका : १३३ किलोमीटर रस्ते शासनाच्या ताब्यातनाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता, या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे निधी नसल्याने अनेक वर्षे प्रमुख मार्गाचे काम रखडल्याने असे रस्त्यांचे जिल्हा मार्गात रूपांतर करून ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यात देण्याची होत असलेली मागणी पूर्णत्वास आली असून, सिन्नर तालुक्यातील ६ इतर जिल्हा मार्ग व दोन ग्रामीण मार्गांचा दर्र्जाेन्नत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे सुमारे १३३ किलोमीटरचे रस्ते शासनाच्या ताब्यात गेले आहेत.

District road quality for eight roads | आठ रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा

आठ रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा

Next
ठळक मुद्देतालुक्यातील ६ इतर जिल्हा मार्ग व दोन ग्रामीण मार्गांचा दर्र्जाेन्नत करण्याचा निर्णयसिन्नर तालुका : १३३ किलोमीटर रस्ते शासनाच्या ताब्यात

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता, या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे निधी नसल्याने अनेक वर्षे प्रमुख मार्गाचे काम रखडल्याने असे रस्त्यांचे जिल्हा मार्गात रूपांतर करून ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यात देण्याची होत असलेली मागणी पूर्णत्वास आली असून, सिन्नर तालुक्यातील ६ इतर जिल्हा मार्ग व दोन ग्रामीण मार्गांचा दर्र्जाेन्नत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे सुमारे १३३ किलोमीटरचे रस्ते शासनाच्या ताब्यात गेले आहेत. याबाबतचा अभ्यास करून जिल्ह्णातील सुमारे १३३ किलोमीटरचे इतर जिल्हा मार्ग व दोन ग्रामीण मार्गांना जिल्हा मार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतला आहे. या मार्गांचा जिल्हा मार्गात समावेशपास्ते, लोणारवाडी, कुंदेवाडी, मुसळगाव, खंबाळा, मºहळ, निºहाळे ते अहमदनगर जिल्हा हद्द- ३१ किलोमीटर लांबी.
डुबेरेपासून पाटोळे, गोंदे, खंबाळा, भोकणी, फर्दापूर, धारणगाव, देवपूर, निमगाव (देवपूर), खडांगळी, मेंढी, सोमठाणे, सांगवी ते इतर जिल्हा मार्ग- ४३ किलोमीटर लांबी.
सिन्नर, सरदवाडी, पास्ते, जामगाव, विंचूर दळवी ते राज्यमार्ग- १५ किलोमीटर लांबी.
सोनांबे, कोनांबे, धोंडबार, औंधवाडी, आगासखिंड ते प्रमुख राज्यमार्ग- २५ किलोमीटर लांबी.
नांदूरश्ािंगोटे, चास, कासारवाडी ते राज्य मार्ग - १६ किलोमीटर लांबी.

Web Title: District road quality for eight roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.