दापूरला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:15 AM2021-02-24T04:15:04+5:302021-02-24T04:15:04+5:30

जिल्हाध्यक्ष मनोहर आव्हाड, तालुकाध्यक्ष संदीप आव्हाड यांच्या संकल्पनेतून लहान मुलांकरिता आरोग्य शिबिर घेण्यात आले. तसेच सातवी ते ...

District level oratory competition held at Dapur | दापूरला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

दापूरला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

googlenewsNext

जिल्हाध्यक्ष मनोहर आव्हाड, तालुकाध्यक्ष संदीप आव्हाड यांच्या संकल्पनेतून लहान मुलांकरिता आरोग्य शिबिर घेण्यात आले. तसेच सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांकरिता ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.

स्पर्धेत ईश्वर साबळे, श्लोक नवसे, साक्षी गुरूकुले या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृत्तीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. व्यसनमुक्त शिवकिल्ले अभियानाचे अध्यक्ष प्रभाकर ताम्हणकर, ललिता मोरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी शालेय समितीचे उपाध्यक्ष मोहन काकड, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष कचुनाना आव्हाड, पोलीसपाटील ज्ञानेश्वर साबळे, चेअरमन दत्तू आव्हाड, रामदास आव्हाड, भगवान आव्हाड, मुख्याध्यापक देसाई, पर्यवेक्षक गुंजाळ, राम चौहान, रोहित महाले, कविता महाले, सुभाष सांगळे आदींसह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो - २३ दापूर

सिन्नर तालुक्यातील दापूर येथे वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जाणता प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोहर आव्हाड, तालुकाध्यक्ष संदीप आव्हाड आदी उपस्थित होते.

===Photopath===

230221\23nsk_15_23022021_13.jpg

===Caption===

फोटो - २३ दापूर सिन्नर तालुक्यातील दापूर येथे वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करताना जाणता प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोहर आव्हाड, तालुकाध्यक्ष संदीप आव्हाड आदी.

Web Title: District level oratory competition held at Dapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.