जानोरी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 23:16 IST2021-08-16T23:14:59+5:302021-08-16T23:16:22+5:30
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीला नाशिक जिल्हा परिषदेकडून सन २०१९-२० या वर्षात स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार म्हणून गौरवण्यात आले असून दहा लाख रुपयाचे बक्षीस पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते देण्यात आले तसेच ग्रामविकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण महाआवास अभियान अंतर्गत तालुकास्तरीय पुरस्कार दिंडोरी तालुक्याचे गटविकास अधिकारी भावसार तसेच सभापती कामिनी चारोस्कर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह मिळाल्याने जानोरी गावात फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

जानोरी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय पुरस्कार
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीला नाशिक जिल्हा परिषदेकडून सन २०१९-२० या वर्षात स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत
तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार म्हणून गौरवण्यात आले असून दहा लाख रुपयाचे बक्षीस पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते देण्यात आले तसेच ग्रामविकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण महाआवास अभियान अंतर्गत तालुकास्तरीय पुरस्कार दिंडोरी तालुक्याचे गटविकास अधिकारी भावसार तसेच सभापती कामिनी चारोस्कर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह मिळाल्याने जानोरी गावात फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, पंचायत समिती सभापती कामिनी चारोस्कर, माजी जि. प सदस्य शंकराव काठे. ग्रामपंचायत सदस्य शंकरराव वाघ, विष्णूपंत काठे, दत्तात्रय घुमरे, अशोक केंग, सुभाष नेहेरे, नामदेव डंबाळे, हिराबाई भोई, ललिता वाघ, विस्ताराधिकारी अण्णा गोपाळ, ग्रामसेवक के. के. पवार, तलाठी किरण भोये, पोलीस पाटील सुरेश घुमरे, तंटामुक्ती अध्यक्ष रेवचंद वाघ, शंकरराव चारोस्कर, सुनील घुमरे, कडूअण्णा वाघ, ज्ञानेश्वर डावणे, सोपान काठे, राजकुमार वाघ, गोरख तिडके, पोपट काठे, हर्षल काठे, योगेश तिडके, डी. बी काठे, सुनील तिडके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय हे दोन्ही पुरस्कार जानोरी गावासाठी एक अभिमान असून हे पुरस्कार मिळविण्यात गावातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग व सहकार्य आहे.
- के. के. पवार, ग्रामविकास अधिकारी, जानोरी