करवाढ रद्द करण्यासाठी जिल्हधिकाऱ्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 18:42 IST2019-12-20T18:42:10+5:302019-12-20T18:42:34+5:30
नगरपालिका सर्वसाधारण सभेतील चतुर्थ वार्षिक मालमत्ता कर व इतर कर आकारणी ठराव रद्द करण्यासाठी येवला नगर परिषदेतील राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष अशा तीनही गटनेत्यांनी नगरसेवकांसह जिल्हाधिकारी यांना निवेदन देत साकडे घातले आहे.

येवला शहरातील करवाढीबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना देताना डॉ. संकेत शिंदे, दयानंद जावळे, रु पेश लोणारी, अमजद शेख, मुस्ताक शेख, निसार निंबूवाले, प्रशांत शिंदे, संतोष परदेशी, सलिम अन्सारी आदी.
येवला : नगरपालिका सर्वसाधारण सभेतील चतुर्थ वार्षिक मालमत्ता कर व इतर कर आकारणी ठराव रद्द करण्यासाठी येवला नगर परिषदेतील राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष अशा तीनही गटनेत्यांनी नगरसेवकांसह जिल्हाधिकारी यांना निवेदन देत साकडे घातले आहे.
पालिकेने ३१ आॅगस्ट २०१७ रोजी केलेला ठराव बेकायदेशीर व चुकीचा आहे. हा तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असलेला ठराव त्वरित रद्द करावा, अशी मागणी २१ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या सर्वसाधारण सभेत २५ नगरसेवकांनी एकमुखाने केली. या मागणीची दखल न घेता केराची टोपली दाखविल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी शहरवासीयांचा आक्र ोश निवेदनाद्वारे थेट जिल्हाधिकाºयांपर्यंत पोहोचविला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या नावे असलेले निवेदन अधिकारी टेकाळे व डॉ. अंतुर्लीकर यांनी स्वीकारले. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे पालिका गटनेते डॉ. संकेत शिंदे, शिवसेना गटनेते दयानंद जावळे, शहरविकास आघाडी गटनेते रु पेश लोणारी यांच्यासह नगरसेवक प्रवीण बनकर, अमजद शेख, मुस्ताक शेख, निसार निंबूवाले, प्रशांत शिंदे, संतोष परदेशी, सलिम अन्सारी, नगरसेवक सरोजिनी वखारे, किरणबाई जावळे, रईसाबानो शेख, साबिया अन्सारी यांनी हे निवेदन दिले.