नुकसानग्रस्त द्राक्षबागांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 17:47 IST2019-11-02T17:46:11+5:302019-11-02T17:47:20+5:30

दिंडोरी : दिंडोरी तालुक्यात सातत्याने पडणार्या परतीच्या पावसाने द्राक्ष बागांसाह टोमॅटो,सोयाबीन,मका,भात, नागली वरई चे मोठे नुकसान झाले असून नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिंडोरी तालुक्याचा दौरा करता दिंडोरी येथे नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करत महसूल विभागाच्या तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. दिंडोरी येथे दिनकर जाधव,बाळासाहेब मुरकुटे यांच्या द्राक्षबागांना भेट देत नुकसानीची जिल्हाधिकारी सुरेश मांढरे यांनी पाहणी केली.

District Collector inspects damaged vineyards | नुकसानग्रस्त द्राक्षबागांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

दिंडोरी येथे नुकसानझालेल्या द्राक्ष बागेची पाहणी करत शेतकर्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी सुरेश मांढरे समवेत विशाल जाधव,दिलीप जाधव,शिवाजी जाधव अभिजित जमधडे आदी.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानी बाबत माहिती घेतली.

दिंडोरी : दिंडोरी तालुक्यात सातत्याने पडणार्या परतीच्या पावसाने द्राक्ष बागांसाह टोमॅटो,सोयाबीन,मका,भात, नागली वरई चे मोठे नुकसान झाले असून नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिंडोरी तालुक्याचा दौरा करता दिंडोरी येथे नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करत महसूल विभागाच्या तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. दिंडोरी येथे दिनकर जाधव,बाळासाहेब मुरकुटे यांच्या द्राक्षबागांना भेट देत नुकसानीची जिल्हाधिकारी सुरेश मांढरे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानी बाबत माहिती घेतली.सातत्याने पडणाºया पावसाने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकरी दररोज औषधे फवारणी करत पीक वाचिवण्याचा प्रयत्न सुरू होते मात्र सातत्याने पडणार्या पावसाने द्राक्ष मनी कुज झाले असून मनी गळ होत मोठे नुकसान झाले असल्याची माहिती शेतकर्यांनी दिली.यावेळी जिल्हाधिकारी यांनी महसूल यंत्रणेला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले यावेळी तहसीलदार कैलास पवार,कृषी अधिकारी अभिजित जमधडे,शिवाजी जाधव,दिलीप जाधव,चंद्रकांत राजे,विशाल जाधव,बाळासाहेब मुरकुटे,सुजित मुरकुटे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
 

Web Title: District Collector inspects damaged vineyards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.