जिल्हा कॅरम स्पर्धेमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST2021-02-05T05:45:54+5:302021-02-05T05:45:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेतील विविध गटांमध्ये उमावती सोनावणे, आयांन पिरजादे, कल्याणी बोन्डे, विराज ...

In the District Carrom Competition | जिल्हा कॅरम स्पर्धेमध्ये

जिल्हा कॅरम स्पर्धेमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेतील विविध गटांमध्ये उमावती सोनावणे, आयांन पिरजादे, कल्याणी बोन्डे, विराज वाकुरे गायत्री चव्हाण, कैफ पिरजादे यांनी विजेतेपद पटकावले.

नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशन, क्रीडा साधना संस्था आणि डी. एस. फौंडेशनच्या वतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या सहकार्याने भारताच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये १४ वर्षे मुले आणि मुली, १८ वर्षे मुले आणि मुली आणि २१ वर्षे मुले आणि मुली या तीन वयोगटांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये रचना विद्यालय, रुंगठा हायस्कुल, लिली व्हाईट स्कूल, र. ज. बिटको शाळा, नाशिकरोड, के. के. वाघ कॉलेज,बिटको कॉलेज नाशिक रोड, नॅशनल हायस्कूल, होरायझन अकादमी या शाळा आणि संस्थांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेतील विजेत्यांना छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक अविनाश खैरनार, अशोक दुधारे, आनंद खरे, टेबल टेनिस प्रशिक्षक शशांक वझे वझे आदींच्या हस्ते मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेची तांत्रिक बाजू कॅरम प्रशिक्षक उमेश सेनभक्त, अभिषेक मोहिते, नीरज कुऱ्हाडे यांनी सांभाळली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक मोहिते यांनी केले. फोटो

जिल्हा कॅरम स्पर्धेत विजेत्या खेळाडूंसोबत मान्यवर अविनाश खैरनार, अशोक दुधारे, आनंद खरे, शशांक वझे.

Web Title: In the District Carrom Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.