जिल्हा बॅँक अध्यक्ष  दराडे यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:42 AM2017-11-29T00:42:04+5:302017-11-29T00:42:42+5:30

District bank president Darade resigns | जिल्हा बॅँक अध्यक्ष  दराडे यांचा राजीनामा

जिल्हा बॅँक अध्यक्ष  दराडे यांचा राजीनामा

Next

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी अडीच वर्षांनंतर अखेर जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडे सादर केला आहे. जिल्हा बॅँकेत अध्यक्ष नरेंद्र दराडे व उपाध्यक्ष सुहास कांदे हे दोन्हीही सेनेचे पदाधिकारी आहेत. सेनेवर सातत्याने कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपाला या निमित्ताने सहकार क्षेत्रात प्रभाव निर्माण करण्याची संधी मिळाली आहे.  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक एप्रिल २०१५ मध्ये झाली होती. त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक जून २०१५ मध्ये झाली. त्यावेळी ही निवड वर्षभरासाठीच असल्याचे संचालक मंडळाच्या काही सदस्यांचे म्हणणे होते. मात्र सातत्याने आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हा बॅँकेची अवस्था ८ नोव्हेंबर २०१६ च्या नोटबंदीच्या निर्णयानंतर अत्यंत अवघड झाली होती. त्यामुळे अध्यक्ष होण्यासाठी फारसे कोेणी उत्सुक नव्हते. दरम्यानच्या काळात वर्षभरासाठी असलेली निवड वर्ष दीड वर्ष उलटूनही विद्यमान पदाधिकारी राजीनामा देत नसल्याने शहराच्या मध्यवस्तीतील एका हॉटेलात डझनभर संचालकांची बैठक होऊन त्यात विद्यमान पदाधिकाºयांवर अविश्वास ठराव आणण्याची खेळी खेळण्यात आली होती. मात्र त्यावेळी हा प्रयोग काही संचालकांच्या विरोधामुळे फसला होता. नोटबंदीच्या आर्थिक टंचाईतून बाहेर काढण्यासाठी जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह काही संचालकांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन जिल्हा बॅँकेला आवश्यक ती मदत करण्याचे साकडे घातले होते. बदल्यात नरेंद्र दराडे यांनी त्यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे राजीनामा दिल्याची चर्चा होती. मागील आठवड्यात नरेंद्र दराडे यांच्या कुटुंबातील एका विवाह सोहळ्यामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी थांबविला होता. मात्र हा सोहळा पार पडताच त्यांनी मंगळवारी (दि.२८) जिल्हा बॅँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांच्याकडे राजीनामा दिल्याचे व बकाल यांनी हा राजीनामा मंजुरीसाठी विभागीय सहनिबंधकांकडे पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले. 
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत भाजपाचे सहा संचालक होते. त्यातील दोघांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता जिल्हा बॅँकेत खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, माजी आमदार माणिकराव कोकाटे व केदा अहेर असे चार संचालक आहेत. त्यामुळे जिल्हा बॅँक अध्यक्षपदावर आता भाजपा दावा सांगण्याच्या तयारीत आहे.

Web Title: District bank president Darade resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.