शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

जिल्हा बॅँकेचे संचालक जेटली यांना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 1:40 AM

नोटाबंदीच्या दिवशी बॅँकेत जमा झालेली रक्कम बदलून देण्यास रिझर्व्ह बॅँकेने नकार दिल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील सात जिल्हा बँकांच्या संचालकांनी थेट केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेण्याचे ठरविले असून, यातील बहुतांशी जिल्हा बॅँकांचे अध्यक्ष भाजपाचेच असल्यामुळे जेटली यांनीही त्यांना भेटीसाठी ७ मार्चची वेळ दिली आहे.

नाशिक : नोटाबंदीच्या दिवशी बॅँकेत जमा झालेली रक्कम बदलून देण्यास रिझर्व्ह बॅँकेने नकार दिल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील सात जिल्हा बँकांच्या संचालकांनी थेट केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेण्याचे ठरविले असून, यातील बहुतांशी जिल्हा बॅँकांचे अध्यक्ष भाजपाचेच असल्यामुळे जेटली यांनीही त्यांना भेटीसाठी ७ मार्चची वेळ दिली आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेच्या आशा पल्लवित झाल्या असून, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेच्या निकालाकडेही त्यांचे लक्ष लागले आहे. रिझर्व्ह बॅँकेने काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात जिल्हा बॅँकांना पत्र पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बाद करण्याची घोषणा केली त्या दिवशी म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी बॅँकांमध्ये आर्थिक व्यवहारापोटी जमा झालेल्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बदलून देण्यास नकार दिला आहे. नाशिक जिल्हा बॅँकेत त्या दिवशी क्लोजिंग बॅलन्स म्हणून २१ कोटी रुपयांच्या नोटा होत्या. त्यामुळे रिझर्व्ह बॅँकेने यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेचा बॅँकेला आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली. नाशिकप्रमाणेच पुणे, नगर, कोल्हापूर, सांगली, नागपूर, वर्धा या जिल्हा बॅँकांनाही त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे सर्व जिल्हा बॅँकांच्या अध्यक्ष व संचालकांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेण्याचे ठरविले व त्यानुसार येत्या ७ मार्च रोजी दिल्लीत ही भेट होऊन त्यात पैशांची मागणी केली जाणार असल्याचे जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :bankबँक