शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

जिल्हा व सत्र न्यायालय : गॅँग रेप प्रकरणी तिघांना वीस वर्षांची सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 22:59 IST

उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवळालीगावाजवळील रोकडोबावाडी परिसरात एका २४ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्काराची घटना २६ फेब्रुवारी २०१४ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले होते.

ठळक मुद्दे तिघांना जन्मठेप प्रत्येकी एक हजार रुपये दंड अशी शिक्षा प्रियकराला जिवे ठार मारण्याची धमकी

नाशिक : एका धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी गेलेल्या प्रेमीयुगुलाला अडवून प्रियकरास बेदम मारहाण करत त्याच्या प्रेयसीवर शेतामध्ये सामूहिक बलात्कार केल्याची घटना रोकडोबावाडी परिसरात चार वर्षांपूर्वी घडली होती. या गुन्ह्यातील एकू ण सहा संशयितांना जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावली. बलात्कारप्रकरणी दोषी आढळलेल्या तिघांना वीस वर्षे सक्तमजुरी व आर्थिक दंड, तर मारहाण करणाऱ्या तिघांना सहा महिने कारावास व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवळालीगावाजवळील रोकडोबावाडी परिसरात एका २४ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्काराची घटना २६ फेब्रुवारी २०१४ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी तत्कालीन महिला उपनिरीक्षक मीना एस. बकाल यांनी संशयितांचा शोध घेऊन त्यांना अटक करत न्यायालयापुढे हजर केले होते. उपनगर पोलीस ठाण्यात बलात्कार, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न आदी कलमान्वये दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. संशयितांनी केलेल्या गुन्ह्याचे सबळ पुरावे बकाल यांनी न्यायालयाला दिले. दरम्यान, या गुन्ह्याचा खटला न्यायालयात सुरू असताना गुरुवारी (दि.१७) जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एच. मोरे यांनी साक्षीदारांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदारांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे जग्गू प्रदीप वानखेडे, केरू ऊर्फ प्रमोद सीताराम गरुड, तुषार ऊर्फ खुशा भगवान भदरंगे या तिघा नराधमांना (सर्व रा. रोकडोबावाडी) न्यायालयाने दोषी धरले. तिघांना जन्मठेप प्रत्येकी एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दरम्यान, मारहाण करणाºया विजय उगले, कैलास बाराहाते, अनिल सदाशिव, दीपक ढोके या आरोपींना सहा महिन्यांचा सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाकडून अ‍ॅड. गायत्री पटणाला, पंकज चंद्रकोर यांनी युक्तिवाद केला.प्रियकराला जिवे ठार मारण्याची धमकीप्रेमीयुगुल धार्मिक स्थळी दर्शन घेऊन दुचाकीकडे येत असताना जवळच्या दुसºया मंदिराजवळ पुन्हा दर्शनासाठी वळले असताना शेतामध्ये सहा जणांचे टोळक्याने त्यांना गाठले. प्रियकरास बेदम मारहाण करीत त्याच्या प्रेयसीलाही मारहाण करीत प्रियकराला जागीच ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली. यावेळी तिघा नराधमांनी एकापाठोपाठ पीडित युवतीवर बलात्कार केल्याची फिर्याद तिने उपनगर पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकाºयांना महिला शांतता समिती सदस्यांच्या समक्ष दिली होती.

टॅग्स :NashikनाशिकRapeबलात्कारGang Rapeसामूहिक बलात्कारnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय