जिल्ह्यात २७ कोरोनाबाधित, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 01:30 IST2021-12-11T01:28:51+5:302021-12-11T01:30:18+5:30

जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १०) २७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर ४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात नाशिक महापालिका हद्दीतील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

In the district, 27 corona-affected, two died | जिल्ह्यात २७ कोरोनाबाधित, दोघांचा मृत्यू

जिल्ह्यात २७ कोरोनाबाधित, दोघांचा मृत्यू

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १०) २७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर ४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात नाशिक महापालिका हद्दीतील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी दिवसभरात नाशिक महापालिका हद्दीत १३, ग्रामीण भागात १३ तर जिल्हाबाह्य १ रुग्ण आढळून आला. माालेगाव शहरात एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही. तर शहरात दोघांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूची एकूण संख्या ८ हजार ७३५ वर पोहचली आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यात ३२५ रुग्ण उपचार घेत आहे. यापुर्वी गुरुवारी (दि. ०९) जिल्ह्यात ३२ रुग्ण आढळून आले तर ५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

Web Title: In the district, 27 corona-affected, two died