ज्येष्ठ नागरिकांना विविध बक्षिसांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 13:02 IST2020-01-25T12:59:10+5:302020-01-25T13:02:42+5:30
शतायुषी जेष्ठ नागरिक संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जेष्ठ नागरिकांसाठी आयोजित क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण नुकतेच उत्साहात संपन्न झाले.

ज्येष्ठ नागरिकांना विविध बक्षिसांचे वितरण
नाशिक: शतायुषी जेष्ठ नागरिक संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जेष्ठ नागरिकांसाठी आयोजित क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण नुकतेच उत्साहात संपन्न झाले. ज्येष्ठांच्या क्र ीडा महोत्सव स्पर्धेतील कॅरममध्ये विजय दीक्षित, विजय भावे, उपविजेते अशोक लोळगे व काचारदास भंडारी यांना तर महिलांमध्ये डॉ.हर्षा विश्र्वरूप, मीना कान्हेरीकर, स्वाती बेलदार, स्मिता जोशी, जयश्री भावे, चंपावती बावकर यांना गौरविण्यात आले. तर बुद्धिबळ स्पर्धेत उदय विश्र्वरूप, विजय भावे, जयश्री भावे , वंदना चांदोरकर यांना तसेच जलद चालणे स्पर्धेत विजय रानडे, माणिकराव बेलदार, महेश संधाने, दिनकर कुलकर्णी, विनायक शिरसाट, भिकाजी पवार, स्वाती बेलदार, जयश्री रेंभोटकर , चंपावती बावकर, वंदना चांदोरकर यांना गौरविण्यात आले. बादलीत चेंडू टाकणे स्पर्धेत वंदना चांदोरकर, वैशाली देशपांडे, संगीत खुर्चीमध्ये महेश संधाने, किरण दीक्षित, मंदाकिनी सवाई, सुनंदा बोदवडकर तर स्टंपमध्ये रिंग टाकणेमध्ये मंगलमूर्ती उपासनी, विनायक शिरसाट, जयश्री रेंभोटकर, मीना कन्हेरीकर या विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देवुन गौरविण्यात आले. यावेळी सतीश सोनवणे, नगरसेवक श्याम बडोदे, निशांत जाधव, अनिता सोनवणे उपस्थित होते.