नगरसूल येथे विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:41 IST2019-12-27T22:40:09+5:302019-12-27T22:41:03+5:30
नगरसूल येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत जातीचे दाखले, नॅशनॅलिटी, डोमिसाइल, शिधापत्रिका आदी दाखल्यांचे वाटप करण्यात आले. प्रांताधिकारी राजेंद्रकुमार पाटील व तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.

नगरसूल येथे राजस्व अभियानांतर्गत विविध दाखल्यांचे वितरण करताना राजेंद्रकुमार पाटील. समवेत रोहिदास वारु ळे, प्रकाश बुरंगुळे, डॉ. अक्षय सालपुरे, प्रमोद पाटील, प्रवीण पाटील, प्रसाद पाटील, सुनील पैठणकर, प्रवीण गायकवाड, सुरेश आहिरे आदी.
नगरसूल : येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत जातीचे दाखले, नॅशनॅलिटी, डोमिसाइल, शिधापत्रिका आदी दाखल्यांचे वाटप करण्यात आले. प्रांताधिकारी राजेंद्रकुमार पाटील व तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी नायब तहसीलदार प्रकाश बुरंगुळे, गटविकास अधिकारी देशमुख, तालुका कृषी विकास अधिकारी नवले, महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक सोमासे, डॉ. अक्षय सालपुरे, संजय गांधी योजनेचे अन्नदाते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध दाखले देण्यात आले.
यावेळी प्रा. प्रमोद पाटील, प्रवीण पाटील, सरपंच प्रसाद पाटील, सुनील पैठणकर, पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड प्र. प्राचार्य सुरेश आहिरे, उपप्राचार्य डी. डी. पैठणकर, पर्यवेक्षक मंगेश नागपुरे आदी उपस्थित होते. राजाराम बिन्नर यांनी सूत्रसंचालन केले. मनोज ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले. जीवनदास बत्तीसे यांनी आभार मानले.