महाराजस्व अभियानात विविध दाखल्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 19:01 IST2019-12-15T19:01:27+5:302019-12-15T19:01:53+5:30
वडनेर भैरव महाराजस्व अभियान २०१९-२० अंतर्गत विविध प्रकारचे दाखले वाटप शिबीर व विस्तारीत समाधान योजना यांचे आयोजन वडनेरभैरव महसुल मंडळ येथे तहसील कार्यालय चांदवड यांचे माध्यमातुन करण्यात आले.

चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे महाराजस्व अभियान अंतर्गत विविध प्रकारचे दाखले वाटप शिबीर प्रसंगी विद्यार्थ्यांना दाखले वाटप करतांना नायब तहसिलदार डॉ.मिनाक्षी गोसावी व हळदे भाऊसाहेब, इरफान कुरेशी, देशपांडे भाऊसाहेब, सरपंच शांताबाई बेंडके, उपसरपंच रावसाहेब भालेराव,बाळासाहेब माळी, मंडळ अधिकारी विजय भंडारे, तसेच सर्व तलाठी, तलाठी गजानन गुंडरे आदी.
वडनेरभैरव : वडनेर भैरव महाराजस्व अभियान २०१९-२० अंतर्गत विविध प्रकारचे दाखले वाटप शिबीर व विस्तारीत समाधान योजना यांचे आयोजन वडनेरभैरव महसुल मंडळ येथे तहसील कार्यालय चांदवड यांचे माध्यमातुन करण्यात आले.
या कार्यक्रमात ८५०विद्यार्थ्यासाठी तयार करण्यात आलेले वय व अधिवास, जातीचे प्रमाणपत्र, दाखले प्रातिनिधीक स्वरु पात वितरीत करण्यात आले. विस्तारीत समाधान योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध सेवा व लाभ वाटप याकरिता तालुक्यातील २१ प्रशासकीय विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.हा कार्यक्र म चांदवड उपविभागाचे प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे व तालुक्याचे तहसीलदार प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
कार्यक्रमास नायब तहसीलदार डॉ. मिनाक्षी गोसावी, तहसिल कार्यालयातील हळदे भाऊसाहेब, इरफान कुरेशी, देशपांडे, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच गावातील पदाधिकारी , सरपंच शांताबाई बेंडके, उपसरपंच रावसाहेब भालेराव, बाळासाहेब माळी , वडनेरभैरव मंडळाचे मंडळ अधिकारी विजय भंडारे, तसेच वडनेरभैरव मंडळातील सर्व तलाठी, तलाठी गजानन गुंडरे, उदय महेर, श्रीमती. सारीका पाटील, धोडंबे तलाठी, धोंडगव्हाण तलाठी, शिक्षक, महाराष्ट्र बॅक अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.