पुरणगावला सोयाबीन बियाणे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 00:35 IST2021-06-15T23:22:52+5:302021-06-16T00:35:34+5:30
जळगाव नेऊर : श्रीकृष्ण कृषी विज्ञान मंडळ, पुरणगाव व कृषी विभागामार्फत मिळालेल्या सोयाबीन बियाण्याचे वाटप व पंचायत समितीच्या वतीने गायगोठा कामाचा कार्यारंभ आदेश कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी सभापती प्रवीण गायकवाड होते.

पुरणगाव येथे पंचायत समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या गायगोठा कामाचा कार्यारंभ आदेश देताना सभापती प्रवीण गायकवाड, सरपंच मंदाकिनी ठोंबरे, हरिभाऊ महाजन, कृषी विज्ञान मंडळाचे सभासद.
जळगाव नेऊर : श्रीकृष्ण कृषी विज्ञान मंडळ, पुरणगाव व कृषी विभागामार्फत मिळालेल्या सोयाबीन बियाण्याचे वाटप व पंचायत समितीच्या वतीने गायगोठा कामाचा कार्यारंभ आदेश कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी सभापती प्रवीण गायकवाड होते.
कार्यक्रमाला कृषी विभागाचे अधिकारी तसेच पुरणगावच्या सरपंच मंदाकिनी ठोंबरे, उपसरपंच रामनाथ ठोंबरे, सदस्य मच्छिंद्र ठोंबरे, श्रावण ठोंबरे, कल्पना ठोंबरे, जिरे पोलीस पाटील गणेश ठोंबरे, प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ महाजन, किरण चरमळ, श्रीकृष्ण कृषी विज्ञान मंडळाचे सर्व सदस्य व परिसरातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. मान्यवरांनी कृषी विभाग तसेच पंचायत समिती, येवलातर्फे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांची माहिती सांगितली. प्रास्तविक राजेंद्र ठोंबरे यांनी केले. किरण चरमळ यांनी आभार मानले.